देशाचे नाव उंचावले याचा अभिमान- पॅरालिंपिक रौप्य पदक विजेती भाविना पटेल

देशासाठी आणखी अभिमानास्पद कार्य करण्याची इच्छा
क्रीडाक्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या भाविना पटेल यांचा रोटरीने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते व्होकेशनल एक्सलन्स अवार्ड देवून रोटरीच्यावतीने गौरव करण्यात आला. यावेळी डावीकडून डाॅक्टर कोटबागी, जिल्हाधिकारी देशमुख,  दीपक शिकारपूरकर, प्रांतपाल शहा व इतर
क्रीडाक्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या भाविना पटेल यांचा रोटरीने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते व्होकेशनल एक्सलन्स अवार्ड देवून रोटरीच्यावतीने गौरव करण्यात आला. यावेळी डावीकडून डाॅक्टर कोटबागी, जिल्हाधिकारी देशमुख, दीपक शिकारपूरकर, प्रांतपाल शहा व इतरsakal
Updated on

कोथरूड : एक महिला खेळाडू म्हणून मी क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव उंचावू शकले याचा मला अभिमान वाटतो. देशासाठी आणखी अभिमानास्पद कार्य करण्याची इच्छा आहे. जागतिक पोलिओ दिनाच्या निमित्ताने रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट 31 31 च्या वतीने पॅरालिंपिक वर्ग 4 टेबल टेनिस मध्ये रौप्यपदक विजेती भविना पटेल यांना होकेशनल एक्सलन्स अवार्ड प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना भाविना पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

वयाच्या पहिल्या वर्षापासून पोलिओशी झुंज देणा-या भाविना यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके मिळवीत क्रीडाक्षेत्रात भारताला मानाचे स्थान मिळवून दिले आहे. क्रीडाक्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या भाविना यांचा रोटरीने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते व्होकेशनल एक्सलन्स अवार्ड देवून गौरव केला. जिल्हाधिकारी राजेश देशमुख, रोटरीचे प्रांतपाल पंकज शहा,  महेश कोटबागी,  गिरीश गुणे,  विवेक दिक्षित, नितीन पाटील, किरण शाह, डाॅ. संजय साताळकर, दिपक शिकारपूरकर  व्यासपीठावर उपस्थित होते.

क्रीडाक्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या भाविना पटेल यांचा रोटरीने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते व्होकेशनल एक्सलन्स अवार्ड देवून रोटरीच्यावतीने गौरव करण्यात आला. यावेळी डावीकडून डाॅक्टर कोटबागी, जिल्हाधिकारी देशमुख,  दीपक शिकारपूरकर, प्रांतपाल शहा व इतर
भारतात AY.4.2 व्हेरियंटमुळे हाय अलर्ट; ब्रिटनमध्ये घातलाय धुमाकूळ

भाविना पटेल म्हणाल्या की, माझे जीवन असे झाले होते की जणू मी जगणे सोडून दिले होते पण माझ्या आयुष्यात टेबल टेनिस आले आणि माझे जीवन नव्याने सुरू झाले. माझ्या जीवनात आनंद आला. अहमदाबाद मध्ये मी संगणक शिकायला आले. तीथे अनेक जण टेबल टेनिस खेळत होते. मी सुध्दा एक गंमत म्हणून टेबल टेनिस खेळू लागले. आता ही परिस्थिती आहे की टेनिस वाचून जगू शकत नाही. क्रीडा क्षेत्रात आता खुप सा-या सुविधा, पाठिंबा उपलब्ध होत आहे त्यामुळे क्रीडा क्षेत्रात आपण खुप चांगली कामगीरी करू शकतो.

पोलिओशी झुंज देत स्वतःचे स्थान निर्माण करू इच्छिणारांसाठी संस्था स्थापन करणार असल्याची माहिती भाविना पटेल यांनी यावेळी दिली. जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले की, फाॅक्स विषाणूनंतर पोलिओशी जग झुंज देत होते. चार दशके जगाने पोलिओ मुक्तीसाठी लढा दिला आहे. जगाला पोलिओ मुक्त करण्यासाठी रोटरीने प्रथम काम सुरू केले. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने हे कार्य सुरू केले. हापकीन संस्थेने पोलिओवर लस विकसित केली. 2014 ला भारत पोलिओ मुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. हापकीन बरोबर काम केले याचा मला अभिमान वाटतो. आता आपण कोरोना महामारीशी झुंजत आहोत. सर्वांनी मिळून कोरोनाला हरवूया. रोटरीचे प्रांतपाल शहा म्हणाले की, भाविना पटेल यांचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. भाविना पटेल यांचे कार्य प्रेरणादायी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.