मंचर - 'आंबेगाव तालुक्यात सातगाव पठार भागात झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अत्यंत काळजीत असलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी अन्यथा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते शेतकऱ्यासह रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.' असा इशारा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यानी दिला.
'कुरवंडी, थुगाव, भावडी, कोल्हारवाडी, कुदळेवाडी या भागात झाल्या नुकसानीची पाहणी करून अंधारे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. कलमोडी (ता.खेड) या धरणातील पाण्यापासून हा भाग वंचित आहे. या भागाला धरणातील पाणी मिळाले पाहिजे तसेच अनेक शेतकऱ्यांची जमीन महसूल खात्याने संपादित केलेली आहे.
संपादनाचे शिक्के काढून टाकावेत व केवळ पंचनामे करण्यात वेळ न दवडता. पिक कर्ज हि माफ करावेत. तसेच नुकसान भरपाईची रक्कम तातडीने मिळावी.' अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
अंधारे म्हणाल्या, 'हातातोंडाशी आलेला गहू, बटाटा, कांदा, लसूण या पिकांचा घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. तसेच पिकाचे कर्ज कसे भरायचे या विवंचनेत शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष खंबीरपणे उभा आहे. राज्यशासनाने ताबोडतोब नुकसान भरपाई द्यावी.'
दुधाच्या बाजारभावाबाबत अंधारे म्हणाल्या, “या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी दुध उत्पादन घेतात. पण दुधाचे खरेदीचे बाजारभाव कोसळले आहेत. त्यामुळे दुध उत्पादक शेतकरी हि आर्थिक संकटात सापडला आहे. गुजरात राज्यात दुधाचे बजारभाव स्थिर आहे.
पण महाराष्ट्रात मात्र केंद्र सरकारकडून दुधाचे बाजारभाव अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील सरकार अस्थिर आहे. त्यामुळेच उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास तयार होत नाही. परिणामतः अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहेत. याला सर्वस्वी केंद्र व राज्यसरकारची धोरणे कारणीभूत आहेत.”
यावेळी शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष देवदत्त निकम, शिवसेनेचे संघटक राजाराम बाणखेले, दिलीप पवळे, भरत मोरे, हेमंत एरंडे, विकास जाधव, अरुणनाना बाणखेले, नंदकुमार बोऱ्हाडे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.