Dilip Walse Patil : ग्रामीण भागातील पतसंस्थामधील गोरगोरिबांच्या एक लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 100 कोटीची तरतूद

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील
Dilip Walse Patil
Dilip Walse Patilsakal
Updated on

पारगाव : ग्रामीण भागातील पतसंस्थामधील गोरगोरिबांच्या एक लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 100 कोटीची तरतूद करण्यात आली असल्याची माहीती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Dilip Walse Patil
Baramati News: शर्यतीतल्या बैल खरेदी-विक्री व्यवहारातून गोळीबार, बैलमालक रणजित निंबाळकर यांचा मृत्यू

दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथे आज शनिवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना श्री. वळसे पाटील यांनी ही माहीती दिली याप्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील आदी उपस्थित होते.

Dilip Walse Patil
Dhule News : उपाशी मरण्यापेक्षा बंदुकीची गोळी खाऊन मरू! शेतकऱ्यांची भूमिका

श्री. वळसे पाटील पुढे म्हणाले ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब ग्राहक व सभासद कष्ट करुन बचत केलेले पैसे बिगरशेती पतसंस्था मध्ये ठेवतात परंतु यातील काही पतसंस्था दुर्दैवाने आर्थिक अडचणीत आल्यातर त्या संस्थात असलेले गोरगरिबांचे पैसे बुडू नये या करिता राज्य शासनाने सादर केलेल्या अर्थ संकल्पात राज्यातील बिगरशेती सहकारी पतसंस्था नियामक मंडळाला पतसंस्थाच्या स्थिरीकरण व तरलतेसाठी 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे यासाठी विशेष तरतूद केली असुन यासाठी शासन पतसंस्थांकडून 100 रुपयांच्या ठेवीमागे फक्त 10 पैसे नाममात्र आकारणी करणार आहे.

Dilip Walse Patil
Nashik Crime News : मानुरला अवैध मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

दुर्दैवाने आर्थिक अडचणीत आलेल्या बिगरशेती पतसंस्था मधील गोर गरिबांचा एक लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण मिळण्यासाठी सहकार मंत्री दिलीप पाटील यांच्या प्रयत्नातून राज्याच्या अंदाजपत्रकात 100 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आल्याने सर्वसामान्यांचा पतसंस्थेवरील विश्वास दृढ होईल असे सांगितले.

- शंकर पिंगळे अध्यक्ष - श्री.कुलस्वामी क्रेडिट को ऑप सोसायटी ली.

Dilip Walse Patil
Nashik Crime News : 5 वर्षांपासून वीज चोरी! 8 लाखांची फसवणूक

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून पतसंस्थामधील गोरगोरिबांच्या एक लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आल्याने दुर्दैवाने आर्थिक अडचणीत सापडलेक्या पतसंस्थातील सर्वसामान्य ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे.

- रवींद्र करंजखेले (माजी पंचायत समिती सदस्य)

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द शासकीय तंत्रशिक्षण संस्थेमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स (उत्कृष्ठतता केंद्र) सेंटरच्या स्थापनेस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात राज्यातील मुंबई, पुणे, नागपुर, अमरावती, यवतमाळ,कोल्हापुर, छत्रपती संभाजीनगर, कराड व अवसरी खुर्द येथील तंत्रशिक्षण संस्थामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स सेंटर स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असुन अवसरी खुर्द येथील सेंटर साठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.