MPSC Result 2023 : पोलिस उप निरीक्षक पदाच्या परीक्षेत सुनील खाचकड राज्यात प्रथम; ५८३ जणांची यादी जाहीर

अखेर आयोगाने बहुप्रतीक्षेत असलेला हा निकाल जाहीर केला.
MPSC Result 2023 PSI
MPSC Result 2023 PSI Sakal
Updated on

MPSC Result 2023 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०२० पोलिस उप निरीक्षक पदा’चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या परीक्षेत राज्यात सुनील खाचकड यांनी प्रथम क्रमांक, निर्मलकुमार भोसले यांनी द्वितीय, तर गणेश जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

MPSC Result 2023 PSI
Pune Crime : पुणे विमानतळावर महिला प्रवाशाकडून २० लाखांचे सोने जप्त; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

राज्यातील पोलिस उप निरीक्षक पदाच्या एकूण ६५० जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. परंतु मागील काही महिन्यांपासून उमेदवार या परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत होते. हा निकाल जाहीर करण्याची मागणी सातत्याने होत होती. आता अखेर आयोगाने बहुप्रतीक्षेत असलेला हा निकाल जाहीर केला.

आयोगाकडून ५८३ जणांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. तर तात्पुरत्या गुणवत्ता यादीत एक हजार ७८२ उमेदवारांचा समावेश आहे. या निकालात आयोगाने उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ई.डब्ल्यु.एस) या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या ६५ पदांचा निकाल राखीव ठेवून तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प आयोगामार्फत मागविण्यात आला आहे.

MPSC Result 2023 PSI
Mumbai Crime : भरदिवसा बॅंकेतून दागिने लंपास, महिलेसह तिच्या मुलाला अटक

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) या प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या न्यायिक प्रकरणावरील न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन ईडब्ल्यूएस या प्रवर्गासाठी राखीव पदांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

MPSC Result 2023 PSI
Mumbai-Agra highway Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात! कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने ७ जणांचा जागीच मृत्यू

या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प साद करण्यासाठी आयोगाच्या ‘https://mpsc.gov.in’ या संकेतस्थळावर ‘ऑनलाइन फॅसिलिटिज्‌’ यामध्ये ‘पोस्ट प्रेफ्ररन्स/ऑपटिंग आउट वेबलिंक उपलब्ध करून दिली आहे.

ही लिंक बुधवारी (ता.५) दुपारी बारा वाजता खुली होणार असून ११ जुलैपर्यंत राहणार आहे. उमेदवारांकडून हा विकल्प प्राप्त झाल्यानंतर आवश्यक तपासणीनंतर अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.