Puja Khedkar : नोकरीसाठी बनावट प्रमाणपत्रांची चलती;दिव्यांग, खेळाडू, ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या गैरफायद्याचा आरोप

नोकरी मिळविण्यासाठी बनावट प्रमाणपत्र सादर करण्यात राज्याने आघाडी घेतली आहे. बोगस खेळाडू प्रमाणपत्रांनंतर आता दिव्यांग आणि आर्थिक मागासांची (ईडब्ल्यूएस) खोटी प्रमाणपत्रे सादर केली जात आहेत.
Puja Khedkar
Puja Khedkarsakal
Updated on

पुणे : नोकरी मिळविण्यासाठी बनावट प्रमाणपत्र सादर करण्यात राज्याने आघाडी घेतली आहे. बोगस खेळाडू प्रमाणपत्रांनंतर आता दिव्यांग आणि आर्थिक मागासांची (ईडब्ल्यूएस) खोटी प्रमाणपत्रे सादर केली जात आहेत. यासाठी राज्यात संपूर्ण साखळीच कार्यरत आहे, अशी माहिती एका अभ्यासकाने ‘सकाळ’शी बोलताना दिली. स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या संस्थांद्वारे आमच्यावर बंदी घातली जाईल, या भीतीने अनेक उमेदवार मूग गिळून गप्प आहेत.

पूजा खेडकर प्रकरण म्हणजे हिमनगाचे टोक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाला (यूपीएससी) वेगवेगळ्या प्रकारे फसविण्यात खेडकर यशस्वी होत असेल; तर इतर आयोग आणि परीक्षांबद्दल बोलायलाच नको, अशी प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली. राज्यस्तरावर कबड्डीचा खेळाडू आणि सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा राजेश पाटील (नाव बदलले) म्हणाला, ‘‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध परीक्षांमध्ये खेळाडूंना आरक्षण असते. याचा फायदा घेण्यासाठी काही उमेदवार पैसे देऊन बनावट प्रशस्तिपत्र आणि शिफारशींद्वारे खेळाडू प्रवर्गाचे आरक्षण मिळवितात. अशा विद्यार्थ्यांची निवड होण्यापूर्वी राज्याच्या क्रीडा मंत्रालयाने त्याची पडताळणी करणे गरजेचे आहे. नुकतीच काही बनावट उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली; पण ती पुरेशी नाही.’’ घरी गडगंज संपत्ती आणि उद्योग असतानाही अनेक विद्यार्थ्यांनी ‘ईडब्ल्यूएस’चे प्रमाणपत्र मिळविल्याचेही उमेदवार सांगतात.

चौकशी व्हावी : अमिताभ कांत

पूजा खेडकर प्रकरणानंतर ‘यूपीएससी’च्या प्रक्रियेतील फसवणूक आणि अनियमिततेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘प्रतिष्ठित परीक्षांमध्ये फायदा मिळविण्यासाठी आरक्षणांचा गैरवापर केला जात आहे.

एससी, एसटी किंवा ओबीसी आरक्षण चालू ठेवावे, याबरोबरच क्रिमीलेअरचे नियम लागू केले जावेत. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंगांसाठी विद्यमान आरक्षण आणि नागरी सेवांमध्ये तृतीय पंथीयांसाठी प्रस्तावित एक टक्का आरक्षणाचे पुनरावलोकन करायला हवे.’

‘राज्यातही चौकशी हवी’

‘‘एमपीएससी आणि सरळसेवा भरतीत आरक्षणातून निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची सखोल चौकशी व्हायला हवी. क्रीडा आणि दिव्यांग मंत्रालयाकडून ते करणे सहज शक्य आहे. यातून गरजू उमेदवारांना न्याय मिळेल,’’ असे मत उमेदवारांनी व्यक्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com