निरगुडसर - शेती अवघी ३५ गुंठे, फक्त दुग्ध व्यवसाय आणि मुलीला पोलीस बनवायचे स्वप्न बाळगलेले आई-वडील, या आई-वडिलांचे कष्ट आणि मुलीच्या जिद्दीतून निरगुडसर गावची सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कन्या अखेर पोलिस बनलीच. आई वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मुलीची जिद्द अनेकांना प्रेरणादायी आहे.
निरगुडसर-बेलसरवाडी येथील गणेश उर्फ (बारकू) टाव्हरे या शेतकऱ्याची मुलगी पूजा टाव्हरे तिची नुकतीच ठाणे शहर पोलीस कॉन्स्टेबलपदी निवड झाली आहे. तिने कुठलाही क्लास न लावता वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मोठ्या जिद्दीने रात्र दिवस अभ्यास केला आणि वडिलांचे स्वप्न अखेर सत्यात उतरवले.