NIRF : एनआयआरएफमध्ये पहिल्या शंभरात ११ संस्था महाराष्ट्रातील

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मध्ये पहिल्या शंभरात महाराष्ट्रातील अकरा शैक्षणिक संस्थांनी स्थान मिळवले आहे.
NIRF
NIRFsakal
Updated on

पुणे - केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मध्ये पहिल्या शंभरात महाराष्ट्रातील अकरा शैक्षणिक संस्थांनी स्थान मिळवले आहे. मागील वर्षी या यादीत १२ संस्था होता. तर विद्यापीठ गटात यंदा शंभरात दहा संस्था असून मागील वर्षीच्या तुलनेत तीन संस्था कमी झाल्या आहेत. सर्वसाधारण रँकिंगमध्ये मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर विद्यापीठांमध्ये होमी भाभा राष्ट्रीय संस्था हे अभिमत विद्यापीठ महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे.

सर्वसाधारण रँकिंगमध्ये यंदाही राज्यात मुंबईतील आयआयटीने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याखालोखाल होमी भागा संस्था, पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) या संस्था आहेत. त्याचप्रमाणे सिम्बायोसिस विद्यापीठ, वर्धा येथील दत्ता मेघे संस्था, पुण्यातील डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाने पहिल्या शंभरात स्थान मिळवले आहे. मुंबई विद्यापीठाचे रँकिंगही घसरले आहे.

विद्यापीठ गटामध्ये महाराष्ट्रातील दहा संस्था पहिल्या शंभरात आहे. त्यामध्ये होमी भाभा संस्था, पुणे विद्यापीठानंतर मुंबईतील आयसीटी आणि सिम्बायोसिस विद्यापीठाचा क्रमांक लागतो. तसेच या यादीत भारती विद्यापीठ व टाटा सामाजिक विज्ञान संस्थेनेही स्थान मिळवले आहे. मागील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या यादीत ८३ व्या क्रमांकावर होते. पण यंदा या विद्यापीठाने पहिल्या शंभरातील स्थान गमावले आहे.

NIRF
Shirur Loksabha : शिरूरमधून लोकसभेसाठी उमेदवार ठरला; शरद पवारांनी जाहीर केले नाव

सर्वसाधारण क्रमवारीतील महाराष्ट्रातील संस्था (क्रमवारी)

१) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (४)

२) होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबई (३०)

३) भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे (३४)

४) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (३५)

५) रासायनिक तंत्रज्ञान संस्था, मुंबई (४१)

६) सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, पुणे (५९)

७) दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन सस्था, वर्धा (७५)

८) डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे (८१)

९) विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर (८२)

१०) एसव्हीकेएमचे नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई (८८)

११) मुंबई विद्यापीठ (९६)

NIRF
Gas Leakage : बेकायदा गॅस विक्री बेतली जीवावर; गॅस गळती होऊन भाजलेल्या तिघांपैकी एकीचा मृत्यू

विद्यापीठ गटातील महाराष्ट्रातील विद्यापीठे (क्रमवारी)

१) होमी भाभा राष्ट्रीय संस्था (१७)

२) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (१९)

३) रासायनिक तंत्रज्ञान संस्था, मुंबई (२३)

४) सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, पुणे (३२)

५) दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था, वर्धा (३९)

६) डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे (४६)

७) नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई (४७)

८) मुंबई विद्यापीठ (५६)

९) भारती विद्यापीठ, पुणे (९१)

१०) टाटा सामाजिक विज्ञान संस्था (९८)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.