पुणे - तुम्ही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी असाल आणि तुमच्याकडे प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र सध्या उपलब्ध नसतील, तर तुम्ही हमीपत्र सादर करू शकता. होय, प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी उर्वरित आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात येतील, असे हमीपत्र विद्यार्थ्यांना पालकांना त्यांच्या स्वाक्षरीने द्यावे लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा असली, तरीही इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस मागील आठवड्यापासून सुरवात झाली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील ३१९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी ही केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सध्या राबविण्यात येत आहे. दरम्यान, प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्जांचा भाग एक भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे ऑनलाइन अर्ज भरताना उपलब्ध नसल्यास त्याबाबतचे हमीपत्र विद्यार्थ्यांना, पालकांना स्वत:च्या स्वाक्षरीने सादर करता येणार आहे. इयत्ता अकरावीच्या प्रवेशादरम्यान कोणत्याही आरक्षणाचा लाभ मिळवायचा असल्यास, आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रे विद्यार्थ्यांना अपलोड करावी लागणार आहेत.
दरम्यान, उपलब्ध असलेली कागदपत्रे विद्यार्थ्यांनी अपलोड करावीत, आणि सध्या उपलब्ध नसलेली उर्वरित आवश्यक प्रमाणपत्रे मूळ प्रतीसह प्रवेशाच्या वेळी सादर करण्यात येईल, असे हमीपत्र (किंवा घोषणापत्र) विद्यार्थ्यांना, पालकांना सादर करावे लागणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अधिकृत संकेतस्थळाद्वारे कळविले आहे.
इन्फोबॉक्स :
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील आकडेवारी :
(आकडेवारी सोमवारी सायंकाळपर्यंत)
तपशील : विद्यार्थ्यांची संख्या
- नोंदणी केलेले : २२,५४२
- अर्ज भरून लॉक केलेले : १०,८१८
- ॲटो व्हेरीफाय झालेले : ४,७२५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.