Pune : नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी,पुणे महापालिका आयुक्तांकडून निधी मंजूर

नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी भवन विभागाकडून निधीची मागणी केली होती. त्यानुसार, आयुक्तांनी दोन कोटी रुपयांचा निधी तत्काळ मंजूर केला आहे, अशी माहिती क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त चेतना केरुरे यांनी दिली
Pune
Punesakal
Updated on

Pune - बालगंधर्व रंगमंदिरासह पुणे शहरातील बहुतांश नाट्यगृहांमधील गैरसोयी दूर करण्यासाठी पुणे महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार, सर्व नाट्यगृहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. संबंधित कामांच्या निविदा प्रक्रियाही सुरू केल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

Pune
Pune Fraud : खोटा अनुभव कनिष्ठ अभियंत्यांना पडला चांगलाच महागात; गमावली नोकरी

नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी भवन विभागाकडून निधीची मागणी केली होती. त्यानुसार, आयुक्तांनी दोन कोटी रुपयांचा निधी तत्काळ मंजूर केला आहे, अशी माहिती क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त चेतना केरुरे यांनी दिली.

Pune
Mumbai Local Train : लोकलमधून 700 प्रवाशांचा मृत्यू! रेल्वे सुरक्षा आयोगाच्या अहवालात खुलासा

बालगंधर्व व अन्य नाट्यगृहांच्या देखभाल दुरुस्तीसाठीच्या निविदा काढलेल्या आहेत. त्यासाठी निधी मंजूर केला असून लवकरच या कामांना सुरुवात होईल.

- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

Pune
Mumbai : आता समुद्रालगत बांधलेल्या दगडी भिंतीचे सर्वेक्षण; लाटांच्या परिणामांचा होणार अभ्यास

निधी कुठे वापरणार

बालगंधर्व रंगमंदिर, कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, सातारा रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच, औंध येथील पं. भीमसेन जोशी कलामंदिर या नाट्यगृहांमध्ये देखभाल दुरुस्तीची कामे होणार आहेत.

वातानुकूलित यंत्रणा, खुर्च्या, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, लाइट, साउंड, रंगरंगोटी, काचा फुटणे अशा प्रकारची कामे केली जाणार आहेत.

अशी होती स्थिती...

वातानुकूलित यंत्रणा बंद पडणे, डासांचा प्रादुर्भाव, अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची कमतरता अशा अनेक गैरसोयींचा सामना बालगंधर्व नाट्यगृहामध्ये सुरू होता.

त्यावर अनेक नामवंत कलाकारांसह प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती. माध्यमांनीही गांभीर्याने दखल घेत हा प्रश्‍नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात आयुक्त विक्रम कुमार यांची मे महिन्यामध्ये बैठक घेऊन नाट्यगृहांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांना तत्काळ सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कलाकार, प्रेक्षकांशी बोलून त्यांच्या अडचणी समजून घेत काम सुरु करण्यास सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.