Pune: सिंहगड रस्त्यावरुन प्रवास करताना सावधान, सिमेंट काँक्रिट सांडल्याने होता आहेत अपघात!

Sinhagad: धोकादायक वाहतुकीकडे होतेय दुर्लक्ष; सिंहगड रस्त्यावरील स्थिती
Pune: सिंहगड रस्त्यावरुन प्रवास करताना सावधान, सिमेंट काँक्रिट सांडल्याने होता आहेत अपघात!
Updated on

निलेश चांदगुडे

Vadgaon: सिंहगड रस्त्यावरील धायरी फाट्याकडून लगड मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरएमसी मिक्सरच्या वाहनातून जागोजागी सिमेंट काँक्रीट सांडल्याने शनिवारी (ता. २०) एका दुचाकी वाहनचालकाचा सांडणाऱ्या खडीवरून घसरून किरकोळ जखमी झाला आहे.

गेल्या दोन आठवड्यापूर्वी मिक्सरमधून सांडणाऱ्या काँक्रिटबाबत सकाळ मध्ये ६ जुलै ला बातमी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आरएमसी मिक्सरमधून वाहनातून जागोजागी सिमेंट काँक्रीट सांडलेले साफ केले होते व आरएमसी मिक्सर प्लँटवर कारवाई करून लाखोंचा दंड आकारला होता.

तसेच आरएमसी मिक्सरच्या वाहनातून जागोजागी सिमेंट काँक्रीट सांडणाऱ्या ठिकाणी रोज साफसफाई करण्यासाठी दोन कामगार ठेवणार होते. परंतु त्याठिकाणी सांडणारे काँक्रिट साफसफाई करण्यासाठी एकही कामगार नसल्याने रस्त्यावर चिखलाचे ढिग तयार झाल्याने दुचाकी वाहनचालक घसरून पडत आहेत.

याबाबत महापालिका प्रशासन व आरएमसी मिक्सरचे मालक गप्प बसून राहत आहेत. महापालिका प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करून अपघाताला कारणीभूत ठरणारे हे काँक्रीट हटविले पाहिजे अशी मागणी वाहन चालक व नागरिक करीत आहेत.

आरएमसी मिक्सर मधून सिंहगड रस्त्याने वाहतूक करताना काँक्रिट रस्त्यावर सांडत आहे. याबाबत आम्ही आमच्या बांधकाम विभागाला कारवाई करण्यासाठी कळविणार आहे. व काँक्रिट सांडणाऱ्या प्लॅन्ट वर आम्ही दंडात्मक कडक कारवाई करणार आहोत.

- संदीप खलाटे, महापालिका सहाय्यक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय

क्षमतेपेक्षा सिमेंट काँक्रिटची वाहतूक करणारे डंपर व आरएमसी मिक्सरमध्ये काँक्रिट वाहतूक करणारी वाहने यांचेवर आरटीओ नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

- राजकुमार बरडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड वाहतूक विभाग

मिक्सर मधून सांडलेले काँक्रीट खाली पडून गतिरोधक तयार झालेले आहेत. त्यामुळे महापालिकेने तातडीने असे सांडलेले काँक्रीट उचलून रस्ता साफसफाई करणे आवश्यक आहे. यामुळे दुचाकीस्वारांना छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. तरी प्रशासनाने यावर कडक कारवाई करावी. संबंधित कंपन्यांना या गोष्टीची ताकीद देण्यात यावी जर त्यांच्याकडून नियमाचं पालन झालं नाही तर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी प्रमुख मागणी आमची आहे.

- महेश पोकळे, विभाग प्रमुख खडकवासला मतदारसंघ, शिवसेना (ठाकरे गट)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.