Pune Accident - संध्याकाळी एसटी अपघातातील जखमींना रुग्णवाहिका चालकाने मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याऐवजी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. एका जखमीचे दोन तासातच तब्बल साडेपाच हजार रुपये बिल झाले.
सदर बिल भरण्यास असमर्थता दर्शविल्याने जखमीला हॉस्पिटलमधून बाहेर सोडले जात नव्हते. ही माहिती समजल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आंबेगाव तालुका महिला आघाडी प्रमुख प्रा.सुरेखा निघोट यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.
तेथे त्यांची, हॉस्पिटल व्यवस्थापक व रुग्णवाहिका चालकामध्ये खडाजंगी झाली. त्यांनतर बिल न घेताच रुग्णाला सोडण्याचा प्रसंग खासगी हॉस्पिटलवर आला. या प्रकारची जोरदार चर्चा मंचर शहरात सुरु झाली आहे.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ अवसरी फाटा (ता.आंबेगाव) येथे पुणे-नाशिक एसटीच्या झालेल्या अपघात पाच प्रवाशी गंभीर जखमी झाले होते.
त्यापैकी चार जखमींना रुग्णवाहिका चालकाने मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याऐवजी केवळ कमिशनसाठीच खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असा आरोप करून आत्ता हे बिल रुग्णवाहिका चालकानेच भरावा असा पवित्रा निघोट यांनी घेतला होता.
निघोट म्हणाल्या “मंचर उपजिल्हा रुगणालयात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तेथे बारा डॉक्टरांचे पथक जखमींच्या उपचारासाठी कार्यरत होते. पण जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करणाऱ्याचे काम रुग्णवाहिका चालकांनी केले.
केवळ आर्थिक मोबदला मिळतो म्हणून हा प्रकार मंचर शहरात सतत घडत आहे. एसटी अपघातातील रुग्ण हे अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत.
त्यांना बिलाची रक्कम सांगितल्यानंतर धक्काच बसला.बिलाची रक्कम भरल्याशिवाय पेशंटला सोडणार नाही. अशी भूमिका हॉस्पिटल व्यवस्थापनाने घेतली. फक्त डोक्याला व हाताला टाके घातले.
कोणतीही औषधे दिली नाहीत. असे जखमी शुभम संजय नाईक (रा.संगमनेर) यांनी सांगितले. माझ्यासह एसटी अधिकाऱ्याने जाब विचारल्यानंतर बिल न घेता रुग्णालयातून जखमीला सोडले.
त्याच हॉस्पिटलमध्ये अजून सायली बेलवकर (रा. इंदिरानगर-निघोटवाडी मंचर) ही झोपडपट्टीत राहणारी महिला उपचार घेत आहे. तिचीही आर्थिक परस्थिती नाजूक आहे. तिचे आम्ही बिल भरणार नाही. अशी भूमिका निघोट यांनी घेतली आहे.
“आंबेगाव तालुक्यात अपघात ग्रस्त जखमींना अक्षरशः रुग्णवाहिका चालक पळवा पळवीचे काम करतात. त्यांना जखमीमागे मिळणाऱ्या कमिशनची चर्चा लोक आत्ता उघडपणे करतात.
हा प्रकार थांबविण्यासाठी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर, ग्राहक पंचायत व पत्रकारांच्या उपस्थितीत लवकरच बैठकीचे आयोजन केले जाईल.”
प्रा.सुरेखा निघोट, महिला आघाडी प्रमुख आंबेगाव तालुका, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.