Pune Accident : सिंहगड घाटात दुचाकी घसरली; पती पत्नी जखमी

सिंहगड घाटात गडावरून परत येताना शनिवारी दुपारी दुचाकी घसरल्याने दोघे जण जखमी झाले असून यात एका महिलेचा समावेश
pune accident two wheelers slide husband wife injured sinhagad road traffic police
pune accident two wheelers slide husband wife injured sinhagad road traffic policeesakal
Updated on

खडकवासला : सिंहगड घाटात गडावरून परत येताना शनिवारी दुपारी दुचाकी घसरल्याने दोघे जण जखमी झाले असून यात एका महिलेचा समावेश आहे. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. सिंहगड घाटात शनिवारी दुपारच्या दीड वाजता हि घटना घडली आहे. यामध्ये विक्रम ठाकूर व शोभा ठाकूर (वय ४५) हे दोघे जखमी झालेले आहेत.

pune accident two wheelers slide husband wife injured sinhagad road traffic police
Accident News : भीषण अपघात! वाहत्या कालव्यात ट्रॅक्टर कोसळला; दोघे भाऊ...

शोभा यांच्या डोक्याला मार लागला आहे. त्यांना तातडीने १०८च्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले आहे. अशी माहिती वन विभागाच्या उपद्रव शुल्क नाक्यावरून मिळाली आहे.

हे दोघे पती पत्नी आहेत. दोघे दुचाकीने (एमएच ३१ - सीडी ३०२७) सकाळी सिंहगडावर फिरायला गेले होते. गडावरून परत येताना जगताप माचीजवळ वडाचे झाड असलेल्या परिसरात आल्यावर अचानक त्यांची गाडी घसरली. दोघे हि गाडीवरून खाली पडले.

pune accident two wheelers slide husband wife injured sinhagad road traffic police
Dhule Accident News : हीट अँड रन प्रकरण, तब्बल 10 महिन्यांनंतर अपघाताचा गुन्हा दाखल!

यात दोघे हि जखमी झाले आहेत. आज शनिवार असल्याने पर्यटकांची संख्या चांगली आहे. अपघातानंतर गडावर जाणाऱ्या एका पर्यटकांने त्यांना त्याच्या कार मधून खाली नाक्यावर आणले. नाक्यावर खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका पोचली होती. त्यात बसवून ससून येथे दाखल करण्यासाठी नेले.

दरम्यान, अपघाताची माहिती वन विभागाला माहिती मिळाली. गोळेवाडी नाका येथून वनरक्षक संदीप कोळी, वन संरक्षण समितीचे सुरक्षा रक्षक नितीन गोळे, नीलेश सांगळे, सचीन थोपटे घटना स्थळी मदतीसाठी धावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.