Pune Accident : उंड्रीजवळ बसची सहा वाहनांना धडक;विचित्र अपघातात दोघे ठार, काय घडलं नेमकं?

पुण्यातील उंड्री चौकात भीषण अपघात
Pune Accident Undri Road  Kondhwa Two people died and 5 were injured
Pune Accident Undri Road Kondhwa Two people died and 5 were injured
Updated on

पुण्यातील उंड्री चौकात भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झालेल्या गाडीने ५ ते ६ गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत.(Pune Accident Undri Road Kondhwa Two people died and 5 were injured )

Pune Accident Undri Road  Kondhwa Two people died and 5 were injured
धक्कादायक प्रकार! १८ दिवसाच्या बाळाला तीन महिलांनी ३ लाखाला विकले; मेंदुचा आजार असल्याचे खोटे सांगितले

मोहम्मदवाडी परिसरात अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. तीव्र उतारावर हा अपघात झाला आहे. कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातातील जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.(Latest Marathi News)

अपघाताचे काही फोटो देखील समोर आले आहेत. अनेक गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. एक रिक्षा उलटली आहे. तर फुटपाथवरील काही दुकानांचंही नुकसान झालं आहे.(Latest Marathi News)

काय घडलं नेमकं?

ही घटना उंड्री परिसरातील एनआयबीएम ते कडनगर रस्त्यावर रविवारी रात्री सव्वासात वाजता घडली.

या अपघातात प्रशांत भानुदास घेमुड (वय ३७, रा. बधेनगर, कोंढवा खुर्द) आणि एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तर, रिक्षाचालक मधू कुवर, रिक्षातील प्रवासी अलिस्टर मर्चंट, मालवाहतूक टेम्पोमधील इस्माईल सय्यद, रफिक देशमुख (रा. लेन क्रमांक ३, सय्यदनगर, हडपसर) हे चौघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ससून आणि खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. कोंढवा पोलिसांनी बसचालक आरोपी मैनुद्दीन मेहबूब शेख (वय ४२, रा. नाना पेठ, कॅम्प चौक, पुणे) याला ताब्यात घेतले आहे. ही मिनी बस द टाइम ट्रॅव्हल कंपनीच्या मालकीची आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयबीएम ते कडनगर रस्त्यावर ऑर्किड पॅलेससमोरील उतारावर वाय जंक्शनजवळ बसचा (क्रमांक एमएच १२- एचबी ०२४२) ब्रेक फेल झाला. त्यामुळे ही बस उतारावरून भरधाव सुटली. बसने समोरून येणाऱ्या सहा वाहनांना धडक दिली, त्यात एका वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य चारजण गंभीर असून, त्यांच्यावर ससून आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात तीन मोटारींसह टेम्पो, रिक्षा आणि एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. मोहसीन शेख (रा. जुना मोदीखाना, कॅम्प), निखिल बक्षी (रा. न्याती ऑपिटल सोसायटी) आणि राजेश जेडीपाल (रा. रहेजा विस्टा सोसायटी) यांच्या मोटारीचे नुकसान झाले आहे. जेडीपाल हेही किरकोळ जखमी झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()