Pune : वास्तुशास्त्रानूसार घराचा जीना कोणत्या दिशेला असावा जाणून घ्या योग्य दिशा

लोकांनी तूम्हाला कधीतरी सांगितले असेल की, घरातील जीना चुकीच्या दिशेला झाला आहे
Pune
Pune Sakal
Updated on

पुणे : घरात येणाऱ्या अनेक लोकांनी तूम्हाला कधीतरी सांगितले असेल की, घरातील जीना चुकीच्या दिशेला झाला आहे. तो बदलून घ्या. पण, आपण याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे घरात नकारात्मक उर्जा आणि गोष्टी घडायला सुरूवात होते. तरीही काही चुका आपल्या लक्षात येत नाहीत. वास्तुशास्त्रामध्ये घर बांधणीशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. ज्याचे पालन केल्यास घरातील वास्तू दोष निघून जातो.

यामुळे कुटुंबात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. वास्तू नियमांनुसार घराच्या प्रगतीसाठी जीना योग्य दिशेला असावा. तो जर चुकला तर घरातील सदस्यांच्या यशाच्या पायऱ्याही खुंटतात.त्यामुळेच पंडीत इंद्रमणि घनश्याल यांनी यावर काय तोडगा दिला आहे ते पाहुयात.

वास्तुशास्त्रानुसार घराचा जीन्यासाठी पश्चिम, नैऋत्य, मध्य दक्षिण, पश्चिम ही दिशा शुभ मानली जाते. या दिशेला जीना बांधणे चांगले असते. यामुळे घरात सुख-समृद्धी टीकून राहते आणि सर्व प्रकारचे दोषही दूर होतात. लक्षात ठेवा जिना ईशान्येला आणि घराच्या मध्यभागी नसावा. यामुळे घरात गरिबी येते. घरातील सुख-शांती नष्ट होऊ शकते.

हे लक्षात ठेवा

वास्तुशास्त्रानुसार जीन्याच्या पायऱ्यांची संख्या विषम असावी. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंचे दरवाजे पूर्व आणि उत्तरेकडील बाजूस उघडणे शुभ मानले जाते. पायऱ्या गोलाकार नसाव्यात. याशिवाय पायऱ्यांखाली स्वयंपाकघर, स्नानगृह, शू स्टँड इत्यादी असू नयेत. यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.