पुणे : पुणे महापालिकेत एखाद्या फाइलवर अनेक दिवस काहीच कार्यवाही होत नाही, प्रस्ताव योग्य असला तरी त्यावर निर्णय लवकर घेतला जात नाही. मात्र, शुक्रवारी (ता. १३) घनकचरा व्यवस्थापन विभागातील जैविक उत्खननाच्या (बायोमायनिंग) निविदेचा प्रशासकीय कार्यतत्परतेमुळे प्रवास सुसाट झाला.