Pune Dam 'त्यानंतर' पावसाचा जोर थोडा वाढला; मागील वर्षी आजच्या दिवशी २१.४९ टीएमसी म्हणजे ७३.७२ टक्के पाणीसाठा

खडकवासला धरणातून शनिवारी दुपारी तीन वाजता एक दरवाजा अर्धा फुटाने उघडून ४२८ क्युसेक पाणी आणि सोडण्यात सुरुवात झाली.
Pune
PuneSakal
Updated on

खडकवासला - खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या चार धरणांमध्ये मागील वर्षी आजच्या दिवशी २१.४९ टीएमसी म्हणजे ७३.७२ टक्के पाणीसाठा होता.

आज २२.२० टीएमसी म्हणजे ७६.१७ टक्के पाणीसाठा झाला आहे. म्हणजे मागील वर्षीपेक्षा आज पाऊण टीएमसी जास्त पाणीसाठा झाला आहे.

शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे मागील २४ तासात खडकवासला येथे सहा, पानशेतला २०, वरसगाव मध्ये २१, टेमघर येथे ४५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद पाटबंधारे विभागाकडे झाली आहे.

Pune
Pune Polution : पुण्यातील प्रदूषणात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाढ; खासगी वाहनांची वाढती संख्या अन्...

खडकवासला धरणातून शनिवारी दुपारी तीन वाजता एक दरवाजा अर्धा फुटाने उघडून ४२८ क्युसेक पाणी आणि सोडण्यात सुरुवात झाली.

त्यानंतर धरण साखळीतील धरणात पावसाचा जोर थोडा वाढला. मध्यरात्री आणखी एक दरवाजा अर्ध्या फुटाने उघडला. त्यावेळी धरणातून ८५६ क्युसेक विसर्ग मुठा नदीत सोडण्यात येत होता.

टेमघरला दीड हजार मिलिमीटर

धरण साखळीतील टेमघर धरणात एक जून पासून १५९८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. हे धरण मागील हंगामात पूर्णपणे रिकामे करण्यात आले होते. आज या धरणात २.०९ टीएमसी म्हणजे ५६.२९ टक्के धरण भरलेले आहे.

Pune
Mumbai : मुंबईला जलसाठ्याचा दिलासा, धरणांमध्ये ६८ टक्के पाणी; त्यामुळे पालिका ऑगस्टमध्ये...

वरसगाव धरणात देखील एक जून पासून १०५८ मिलिमीटर पाऊस पडला असून त्यामुळे धरणात सध्या ९.४८ टीएमसी म्हणजे ७३.९७ टक्के धरण भरले आहे.

पानशेत धरणात एक जून पासून १०५२ मिलिमीटर पाऊस पडला असून त्यामुळे धरणात सध्या ८.६८ टीएमसी म्हणजे ८१.४७ टक्के धरण भरले आहे.

Pune
Nashik Mumbai Highway : नाशिक-मुंबई वाहतूक कोंडी दूर होणार; मुख्यमंत्र्यांचे बैठकीत महत्त्वाचे निर्णय

खडकवासला येथे एक जून पासून २६४ मिलिमीटर पाऊस पडला असून त्यामुळे धरणात सध्या १.९६ टीएमसी म्हणजे ९९.१६ टक्के धरण भरले आहे.

खडकवासला प्रकल्पातील चार ही धरणात २५ जुलै रोजी जास्त पाऊस झाला. त्या दिवशी म्हणजे २४ तासात १२७८ दशलक्ष घनफूट येवा(आवक) होता.

मागील काही दिवस तो ९००, ८०० दशलक्ष घनफूट पर्यत होता. शनिवारी सकाळी मागील २४ तासातील येवा ७५१ दशलक्ष घनफूट होता. रविवारी सकाळी मागील २४ तासातील येवा ५५४ दशलक्ष घनफूट होता. म्हणजे पाणी जमा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.