Pune : देवाच्या आळंदीमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये डोळे येण्याची साथ; शाळा बंद ठेवण्याच आवाहन

राष्ट्रिय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत चार पथके पाठविण्यात आली असून संसर्ग झालेल्या रूग्णांची पुढील आठवडाभर घरोघरी तपासणी केली जाईल.
Pune
Pune Sakal
Updated on

आळंदी - वातावरणातील बदल आणि एकमेकांच्या सततच्या संपर्कामुळे आळंदीत वारकरी तसेच शालेय विद्यार्थ्यांमधे डोळे येण्याची (कंजंक्टीव्हायटिस) साथ वाढली आहे. सोमवारपासून(ता.१७) साथीमुळे आळंदी शहरात जवळपास सोळाशे विद्यार्थी त्रस्त आहेत.

जिल्हा आरोग्य विभागाकडून आळंदीत शाळा आणि वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांची तपासणी करण्याकरिता राष्ट्रिय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत चार पथके पाठविण्यात आली असून संसर्ग झालेल्या रूग्णांची पुढील आठवडाभर घरोघरी तपासणी केली जाईल. माहिती जिल्हा परिषद मुख्याधिकारी आयुष प्रसाद आणि ग्रामिण रूग्णालय वैद्यकिय अधिक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी दिली.

Pune
Pune : महसूलीतील तूटीमुळे कोंढव्यातील स्लॉटर हाऊस बंद करावेच लागेल - पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन

पालिकेच्या चारही शाळांना शनिवारी (ता.२२) सार्वजनिक सुटी जाहिर केली.

डोळे येण्याची साथ आळंदीत वाढल्याने विद्यार्थी आणि पालकांनी धसका घेतला आहे. मात्र वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांमधे प्रमाण अधिक आहे. एकाच खोलित अनेक विद्यार्थी एकत्र राहत असल्याने डोळे येणा-या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढली.

स्थानिक ग्रामिण रूग्णालय, तालुका वैद्यकिय अधिकारी, जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी वेळिच दखल घेत आळंदी राष्ट्रिय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत स्वतंत्र चार पथके पाठवली.

Pune
Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेत बनावट ओळखपत्रांचा सुळसुळाट

यामधे दोन डॉक्टर, एक फार्मसिस्ट, एक वाहनचालक असे प्रत्येक पथकात नेमणूक केली आहे. ही पथके आळंदीतील शाळांची तपासणी करत आहेत. याचबरोबर उद्यापर्यंत वारकरी विद्यार्थी असलेल्या संस्थामधेही तपासणी करणार आहेत.

तसेच आळंदीलगतच्या गावामधिल शाळांची तपासणी केली जाणार आहे. आळंदीतील चार अंगणवाडी विद्यार्थ्यांची तपासणी केली आहे. या पथकाकडून उपचार, मार्गदर्शन आणि तपासणी केली जात आहे.

याबाबत ग्रामिण रूग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ उर्मिला शिंदे यांनी सांगितले, सोमवारपासून साथीचे रूग्ण रूग्णालयात आले. पहिल्या दिवशी साडे चारशे, दुस-या दिवशी सातशे चाळिस तिस-या दिवशी दोनशे दहा आणि चौथ्या दिवशी एकशे साठ विद्यार्थी आले होते. केळगावमधे अठ्ठ्यान्नव विद्यार्थी बाधित आहेत.

खास करून वारकरी विद्यार्थ्यांना संसर्ग झाला आहे. मात्र जिल्हा आरोग्य विभागाकडून पुरेशी आणि तत्काळ मदत मिळाली. यासाठी पुरेसा औषधसाठा असल्याने औषधही दिले जात आहे. गट शिक्षण अधिकारी, पालिका प्रशासन अधिकारीआणि तालुका व्ैद्यकिय अधिकारी यांनी पत्रव्यवहार करून साथीच्या आजारीची माहिती दिली तसेच साथ आटोक्यात येईपर्यंत शाळांना सुटी देण्याची सूचनाही केली आहे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, शैक्षणीक संस्थांमधे सोमवारपासून आळंदीत संसर्ग वाढला. जवळपास पंधराशे चाळिस जणांना संसर्ग झाला.जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.

Pune
Pune Crime : कात्रजमध्ये महिलेसह दोघांवर हत्याराने वार; आरोपीला अटक

औषधसाठा पुरविला असून स्वतंत्र बाह्यरूग्ण तपासणी केंद्र स्थानिक पातळीवर केले आहे. सोबत एनआयव्हीची पथकही तैनात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी याबाबत लक्ष ठेवून आहेत. घरोघऱी तपासणीचे आदेश दिले आहेत. लवकरच साथ आटोक्यात येईल. बरे होण्याचे प्रमाण वाढत आहेत.

तालुका वैद्यकिय अधिकारी इंदिरा पारखे,शाळकरी मुलांमधे साथ आहे. ग्रामिण रूग्णालयात उपचार सुरू असून बहूतेक बरे होत आहे. परिसरातील आश्रमशाळा, अंगणवाडी, शाळांचा तसेच आळंदी मंडलातील घरोघऱी तपासणी केली जात आहे. बाधित मुलांना स्वतंत्र ठेवावे किंवा जास्त बाधित मुले असतील तर संबंधित शाळा बंद ठेवण्याचे आवाहन संस्थांचालकांना केले आहे.

Pune
Mumbai Crime : बँक फसवणूक प्रकरणी जेट एअरवेजचे नरेश गोयलांविरोधात ईडीने केला गुन्हा दाखल

मुख्याधिकारी कैलास केंद्रे, पालिका शाळेतील पाचशे मुलांना लागण झाली होती. मुख्याध्यापकांना साथ संसर्गाबाबत माहिती घेवून विद्यार्त्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

संसर्ग झालेल्या विद्यार्थ्यांना विलगीकरण करण्याचे आवाहन संस्था चालकांना पालिकेकडून केले. तर पालिकेच्या चार शाळा आणि त्यातील विद्यार्थी अडिच हजार विद्यार्थ्यांना शाळेत न येण्याचे आवाहन केले. तसेच चारही शाळांना शनिवारी (ता.२२) सार्वजनिक सुटी जाहिर केली.

Pune
Pune : पुणे जिल्ह्यातील ३५५ शाळांना दोन दिवस सुट्टी

१)डोळे आलेल्यांच्या तपासणीसाठी ग्रामिण रुग्णालयात स्वतंत्र ओपिडी.

१) पालिकेच्या चारही शाळांना शनिवारी (ता.२२) सार्वजनिक सुटी जाहिर केली.

२) आळंदीत जवळपास सोळाशे जणांना संसर्ग..

३) संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी घरोघरी तपासणी.

४) राष्ट्रिय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत स्वतंत्र चार पथके आळंदीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.