शहांचं आंदोलनाच्या पावित्र्यातील शिवसैनिकांना थेट भेटीचं निमंत्रण

केंद्रीय गृहमंत्री सध्या पुणे दौऱ्यावर आहेत.
Amit Shah
Amit ShahTeam eSakal
Updated on

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त शिवसेनेचे पदाधिकारी आंदोलन करणार होते. मात्र, याची माहिती शहांना मिळताच त्यांनी या शिवसैनिकांना (Shiv Sena) थेट भेटीचं निमंत्रण दिलं आहे. आज (रविवार) संध्याकाळी साडेसात वाजता शिवसेनेचं हे शिष्टमंडळ अमित शहा यांची भेट घेणार आहे. बंगळूरूमध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार आहे. (Pune Amit Shah invites Shiv Sainik who are ready to protest during Shah rally)

Amit Shah
"डॉ. आंबेडकरांना अपमानित करण्याची एकही संधी काँग्रेसनं सोडली नाही"

शिवसेनेच्या या शिष्टमंडळामध्ये सचिन अहिर, संजय मोरे, गजानन थरकुडे यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. संध्याकाळी साडेसातवाजता हे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. भाजपचे शहरातील पदाधिकारी, पुणे पोलीस आयुक्त, सह आयुक्त डॉ. शिसवे यांनी आमच्याशी चर्चा करुन अमित शहा यांच्या भेटीसाठी संध्याकाळी साडेसात वाजताची वेळ दिली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयातून आम्हाला तसे पासही देण्यात आले आहेत, अशी माहिती शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दिली.

Amit Shah
स्वातंत्र्यासाठी गोव्याने सर्वात जास्त काळ संघर्ष केला - PM मोदी

मोरे यांनी सांगितलं की, शिवसेनेचं चार जणांचं शिष्टमंडळ अमित शहांना भेटून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेबाबत सर्व गोष्टींचा उहापोह केला जाणार आहे. ही विकृती वेळोवेळी ठेचली गेली पाहिजे. पुण्यात अमित शहा कार्यक्रमाला आले आहेत, हा महापालिकेचा कार्यक्रम आहे. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन आणि डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरणाच्या कार्यक्रमाचे मोठे होर्डिंग्ज शहरात लावण्यात आले आहेत. पण या महापुरुषांचे फोटोही लावण्याची त्यांची मानसिकता होत नाही ही गोष्टही आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()