पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे सध्या पुणे शहराच्या (Pune City) दौऱ्यावर आहेत. दिवसभरातील विविध कार्यक्रम उरकल्यानंतर त्यांनी आज (रविवार) रात्री दिवंगत बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. त्याचबरोबर शिवशाहिरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.
यावेळी पुरंदरेंच्या कार्याचा गौरव करताना अमित शहा म्हणाले, "आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि धर्मपरायणतेचा गौरवशाली इतिहास आपल्या अद्भुत लेखनाने आणि ओजस्वी वाणीने जनमानसात रुजवला. तसेच याद्वारे राष्ट्र आणि धर्म रक्षणाची अखंड ज्योत पेटवली"
दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांचं स्वप्न असलेल्या शिवसृष्टीच्या कामाचा आढावाही यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला. शिवसृष्टीच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेताना ती पूर्णत्वास नेण्यासाठी काय करावे लागेल? अशी विचारणाही त्यांनी संबंधितांकडे केली.
अमित शहा यांनी सकाळी पुणे महापालिकेच्यावतीनं पालिकेच्या आवारात आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं. तसेच महापालिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचंही त्यांनी यावेळी अनावरण केलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.