Pune : शिष्यवृत्ती परीक्षेत सानेगुरुजी विद्यामंदिराचा अश्विन बाठे जिल्ह्यात पहिला तर राज्यात पाचवा

या निकालाच्या निमित्ताने शाळेने आपली शिष्यवृत्ती परिक्षेतील यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
Pune
Punesakal
Updated on

Pune - गेल्या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत येथील महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी विद्यामंदिराचे २१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. त्यातील अश्विन बाठे या विद्यार्थ्याने २७६ गुण मिळवून राज्यात पाचवा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. कु. सिया बारटक्के या विद्यार्थिनीने २६८ गुण मिळवत राज्यात नववा तर जिल्हयात सहावा क्रमांक पटकावला आहे. हे दोन्हीही विद्यार्थी सध्या सहावीत शिकत आहेत.

Pune
Mumbai News : पाकिस्तानी सीमाला परत द्या, अन्यथा मुंबईत घातपात; पोलिसांना अज्ञाताकडून धमकीचा कॉल

या निकालाच्या निमित्ताने शाळेने आपली शिष्यवृत्ती परिक्षेतील यशाची परंपरा कायम ठेवली आहे. अश्विन बाठे व कु. सिया बारटक्के यांच्यासह सोहम उगलमोगले, सार्थक जाधवर , सोहम जायभाये, जय आचार्य, देवश्री करंजकर,

त्रिशा डोंबाळे, निहारिका लाळगे, जान्हवी वलवे, गौरी बनकर, ईश्वरी माने, ज्ञानेश्वरी ढाकणे, आभा गोवंडे, अनुष्का खेडेकर, शार्दुल बाबर, संस्कृती टिळेकर, पल्लवी कऱ्हाळे, अर्णव गंधट, वैष्णवी दिवेकर व अवंतिका गायकवाड या २१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे. शिक्षिका सोनाली कुंजीर, सुनिता कारंडे व माया जरांडे यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

संस्थेचे सचिव अनिल गुजर, सहसचिव अरुण गुजर, मुख्याध्यापक सुरेश गुजर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.