पुणे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून अडीच हजारांहून अधिक सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. गेल्या दोन दिवसांत राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदीत गुन्हे शाखेकडून १५ तडीपार गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, सराइतांकडून २५ पिस्तूल आणि ३८ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.