पुणे - शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्कमधील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात होत असून, या ठिकाणी तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे..मतमोजणीच्या दिवशी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मतमोजणी केंद्रासह शहरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उमेदवारांचे निवासस्थान, राजकीय पक्षांच्या कार्यालयांसह संवेदनशील ठिकाणीही पोलिसांचा बंदोबस्त असेल. मतमोजणी केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे..पोलिस सह आयुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्यासमवेत शीघ्र कृती दल, केंद्रीय सशत्र पोलिस आणि राज्य राखीव पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली..मतमोजणी केंद्र परिसरातील बंदोबस्त -अतिरिक्त पोलिस आयुक्त- ४पोलिस उपायुक्त- ११सहाय्यक पोलिस आयुक्त- १९पोलिस अधिकारी- ३५०पोलिस अंमलदार- २५००केंद्रीय सशत्र पोलिस बल कंपनी- १२राज्य राखीव पोलिस बल कंपनी- २.वाहतूक नियोजन-कोरेगाव पार्क येथील मतमोजणी केंद्रासमोरील साऊथ मेन रस्त्यावर पूर्वेस गल्ली क्रमांक पाच जंक्शन, पश्चिमेस गल्ली क्रमांक दोन जंक्शन तसेच, गल्ली क्रमांक तीन आणि चारच्या दोनशे मीटरपर्यंत सर्व वाहनांना ‘नो पार्किंग’ असेल.- डॉन बॉस्को युवा केंद्रापासून पुणे साऊथ मेन रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील.- सेंट मीरा महाविद्यालय आणि अतुर पार्क सोसायटीकडून साऊथ मेन रस्त्याकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद.- गल्ली क्रमांक पाच, सहा आणि सातकडून साऊथ मेन रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना पुढे प्रवेश बंद राहील. वाहनांनी उजवीकडे वळण घेऊन इच्छित स्थळी जावे..कोरेगाव पार्क परिसरात वाहनांसाठी पार्किंग सुविधा(नागरिकांनी या लिंकमधील ठिकाणी वाहने पार्क करावीत.द पूना स्कूल (अंध शाळा), नॉर्थ मेन रस्ता (फक्त चारचाकी)https://maps.app.goo.gl/E8CzKAALEcDr5vj28पूज्य कस्तुरबा गांधी शाळा (फक्त दुचाकी)https://maps.app.goo.gl/bJr75JbCcDWJMMKx8रोही व्हिला लॉन्स (दुचाकी/चारचाकी )https://maps.app.goo.gl/o9a26QboCgFe51DX8#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.