Pune Assembly Election 2024 : कसब्यात भाजपमध्ये 'पोस्टरवॉर', रासने - घाटे समर्थक भिडले

Pune: विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये पोस्टर वार रंगल्याचे चित्र कसबा मतदारसंघात पाहायला मिळत आहे.
pune assembly elections
pune assembly electionssakal
Updated on

पुणे: विधानसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरलेले आहेत. पुणे शहरामध्ये आज महायुतीमध्ये भाजपकडे असणाऱ्या सहा मतदारसंघांमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेतला जात आहे. एका बाजूला ही प्रक्रिया सुरू असताना निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये पोस्टर वार रंगल्याचे चित्र कसबा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने हे कसब्यातून लढण्यासाठी पुन्हा एकदा तयारी करत आहेत, तर शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडून देखील उमेदवारीवर दावा ठोकण्यात आला आहे. रासने आणि घाटे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टर्स व्हायरल केली जात आहेत.

pune assembly elections
Kasba kingmaker Girish Bapat : कसब्याचे किंगमेकर गिरीश बापटांचा राजकीय प्रवास; संघ स्वयंसेवक, नगरसेवक ते खासदार

कसबा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. पोटनिवडणुकीत पराभव होऊन देखील हेमंत रासने यांच्यावर निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या माध्यमातून त्यांनी लोकांच्या समस्या सोडवण्यासह विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संपर्क वाढवण्यावर भर दिला. दुसरीकडे शहराध्यक्ष असणारे धीरज घाटे यांच्याकडून देखील उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

आज कसबा विधानसभा मतदारसंघात पक्ष निरीक्षकांकडून मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेण्यात आल. यासाठी बंद लिफाफ्यामध्ये पसंती क्रमानुसार तीन नावे देण्यास सांगण्यात आलं आहे. मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी, शहर, राज्य तसेच प्रदेशावर काम करणारे पदाधिकारी यांची मते यावेळी जाणून घेण्यात आली, हे बंद लिफाफे थेट प्रदेश कार्यालयामध्ये उघडले जाणार असून पक्षाकडून करण्यात आलेला सर्व्हे, मतदारसंघातील कामगिरी हे मुद्दे लक्षात घेत उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. कसबा मतदारसंघात शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख हेमंत रासने, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट इच्छुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.