पुण्यातल्या शास्त्रज्ञांची आणखी एक भरारी; अवकाशातील दुर्मिळ घटना टिपली!

पुण्यातल्या शास्त्रज्ञांची आणखी एक भरारी; अवकाशातील दुर्मिळ घटना टिपली!
Updated on

पुणे : ब्रह्मांडात सुपरनोव्हासारखी दुर्मिळ अशी ट्राझीएंट नावाची प्रकाशमान घटना शास्त्रज्ञांनी टिपली आहे. विशेष म्हणजे यातून प्रकाशाच्या जवळपास अर्ध्या वेगाने होणारे उत्सर्जन टिपण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. प्रक्षोभकपणे क्षणार्धात प्रकाशमान होणारा हा स्रोत महाकाय ताऱ्यांच्या मृत्यूचा नवीन अध्याय रचेल, अशी शक्यषता शास्त्रज्ञ व्यक्त करत आहे. आंतररराष्ट्रीय स्तरावरील या संशोधनात पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राच्या शास्त्रज्ञांचा सहभाग आहे. नारायणगाव जवळील जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) च्या साहाय्याने ही घटना टिपण्यात यश आले आहे. 

"जीएमआरटी'बरोबरच कार्ल जी जानस्की वेरी लार्ज अरे (व्हीएलए) आणि चंद्रा एक्सभ रे टेलिस्कोपच्या साहाय्यानेही काही निरीक्षणे घेण्यात आली. संशोधनात एनसीआरएच्या प्रा.पूनम चंद्र, डॉ.ए.जे.नयना, अमेरिकेतील नॉर्थ वेस्टन युनिव्हर्सिटीच्या डॉ. डीएने कोपिंजंस, डॉ.डी मार्गट्टी आदींचा संशोधनात सहभाग आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय आहे संशोधन?
महाकाय तारा मृत्यू पावताना होणाऱ्या महाशक्तिशाली विस्फोटाला सुपरनोव्हा असे म्हणतात. सुपरनोव्हा सारखीच अतिशय दुर्मिळ असलेली ही घटना फास्ट ब्ल्यू ऑप्टिकल ट्रांझीएंट (एफबीओटी) नावाने ओळखली जाते. 2018मध्ये सर्वात प्रथम शास्त्रज्ञांना अशी घटना टिपण्यात यश आले होते. सामान्य सुपरनोव्हापेक्षा अतिशय प्रकाशमान असलेल्या या "एफबीओटी'मधून मोठ्या प्रमाणावर विद्यूततरंगलहरींचे उत्सर्जन होते. विशेषतः क्ष किरणे, अतिनिल, प्रकाश आणि रेडिओ लहरींचे उत्सर्जन होते. काही दिवसांतच हे उत्सर्जन झपाट्याने कमी होते. एफबीओटी मधून उत्सर्जन शास्त्रज्ञांनी दुर्बिनींच्या साहाय्याने टिपली. त्यांच्या निरीक्षणावरून असे लक्षात आले की, एफबीओटी मधून प्रकाशाच्या वेगाच्या 40 टक्के वेगाने यातून उत्सर्जन होत आहे. इतक्या् प्रचंड वेगाने होणारे हे उत्सर्जन शास्त्रज्ञांना चकित करणारे आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कसे झाले संशोधन?
संपूर्ण आकाशाचे ठराविक दिवसांनी दुर्बिणीच्या साहाय्याने स्कॅनिंग करण्यात येते
स्कॅनिगमध्ये अल्पकाळ प्रकाशित झालेल्या घटनांची शास्त्रज्ञांनी नोंद घेतली ट्रांझीयंट प्रकारातील या घटनेचा नंतर सखोल अभ्यास करण्यात आला
संबंधित घटना एफबीओटी असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले
क्ष किरणे, प्रकाश आणि रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने त्यांची निरीक्षणे घेण्यात आली
निरक्षणांद्वारे मिळालेल्या माहितीच्या पृत्थक्करणातून वेगवान उत्सर्जनाची कल्पना शास्त्रज्ञांना आली 

एफबीओटीची वैशिष्ट्ये
सीएसएस 161010 नावाने ओळखली जाणारी ही एफबीओटी पृथ्वीपासून 500 प्रकाशवर्षे अंतरावर आहे
प्रथमतःच सुपरनोव्हाचा नवीन प्रकार प्रकाशात आला
रेडिओ लहरींमध्येही सर्वाधिक प्रकाशमान असलेला एफबीओटी
एफबीओटी हा स्फोट गॅमा किरणा इतकेच प्रक्षोभक
हायड्रोजनसह बऱ्याच गोष्टींनी वेढलेला हा एफबीओटी 

संशोधनाची पुढील दिशा
अधिकाधिक एफबीओटींचा शोध घेण्यात येईल
त्यांतून उत्सर्जित होणाऱ्या विद्यूतचुंबकीय लहरींचे निरीक्षणे घेण्यात येईल
त्याद्वारे नवीन प्रश्नां चा शोध घेण्यात येईल 

अनुत्तरीत प्रश्नप
एफबीओटीची निर्मिती नक्की कशी झाली
एफबीओटीला ऊर्जा कशी प्राप्त होते
याचा स्रोत कृष्णविवर आहे का न्यूट्रॉन स्टार 

रेडिओ लहरींच्या माध्यमातून टिपण्यात आलेले हे पहिले एफबीओटी आहे. जीएमआरटीच्या माध्यमातून याची निरीक्षणे एका वर्षाच्या कालावधीसाठी घेणे शक्यफ झाले. या एफबीओटीचे अत्यंत शक्तिशाली केंद्रीय इंजिन सर्वांसाठी आकर्षणाचा विषय आहे.
प्रा. पूनम चंद्र, सहयोगी प्राध्यापक, एनसीआरए.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()