Dead_Galaxy
Dead_Galaxy

पुण्यातील शास्त्रज्ञांनी शोधली दुर्मिळ आकाशगंगा; कसं आहे तिचं स्वरुप?

Published on

पुणे : अवकाशात दुर्मिळ असलेल्या मृत आकाशगंगेचा शोध पुण्यातील शास्त्रज्ञांनी घेतला आहे. शिल्लक अवशेषांतून रेडिओ लहरींचे उत्सर्जन करणाऱ्या या आकाशगंगेला 'जे 1615+5452' म्हणून ओळखले जात आहे. राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकशास्त्र केंद्राच्या (एनसीआरए) डॉ. सी. एच. ईश्‍वर-चंद्रा आणि आफ्रिकेतील डॉ. झारा आर. यांचे हे संशोधन 'आर्काईव्ह' या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.

संपूर्ण आकाशगंगाच कृष्णविवराने गिळंकृत केल्यावर, त्यातील इलेक्‍ट्रॉनच्या वारंवारीतेमुळे रेडिओ तरंगे उत्सर्जित होतात. अशा आकाशगंगेला रेडिओ आकाशगंगा म्हणून ओळखले जाते. मृत अवस्थेतील अशा आकाशगंगांचे अवशेष सापडणे दुर्मिळ असते. पण त्याचबरोबर तिचा अभ्यास करणेही आव्हानात्मक आहे.

शास्त्रज्ञांनी खोडद (नारायणगाव) येथील जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) आणि साउथ आफ्रिकन ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्झवेटरीच्या साहाय्याने या आकाशगंगेचा शोध घेतला आहे. डॉ. ईश्‍वर चंद्रा म्हणाले, "सामान्य आकाशगंगांप्रमाणे यामध्ये जटील गाभा, प्रकाश आणि पदार्थाचे वेगाने होणारे उत्सर्जन (जेट) आणि उष्ण ठिकाणे आढळली नाहीत. सुमारे काही लाख वर्षांपूर्वीच तिच्यातील इंधन संपुष्टात आले आहे.'' 2017-18मध्ये शास्त्रज्ञांनी या आकाशगंगेचा शोध घ्यायला सुरवात केली होती. 

आकाशगंगेची वैशिष्ट्ये : 
- आकारमान तीन लाख प्रकाशवर्षे 
- 7.6 कोटी वर्षाचे वय 
- 2.1 कोटी वर्षांपूर्वी मृत्यू झाला 
- 150 ते 1400 मेहाहर्टझ वारंवारीतेने लहरींचे उत्सर्जन 
- जीवनकाळातील सुमारे 30 टक्के वेळ हा नष्ट होण्यासाठी लागला.

संशोधनाचे फायदे : 
- आकाशगंगा आणि कृष्णविवरांच्या उत्क्रांतीचा काळ समजून घेण्यास मदत होईल.
- यांसारख्या अधिकच्या आकाशगंगा सापडल्यास सॅंपल साईझ वाढेल.
- खगोलशास्त्रातील संशोधनाला चालना मिळेलच. 
- देशातील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी अधिक माहिती उपलब्ध होईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उपलब्ध खगोलीय माहितीच्या आधारे शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. तसेच, अद्यावत जीएमआरटीमुळे (युजीएमआरटी) अशा प्रकारचा अनेक आकाशंगंगाचा शोध घेणे शक्‍य होणार आहे. येत्या काळामध्ये रेडिओ अवकाश शोधांचे खजिनाच आमचे शास्त्रज्ञ समोर घेऊन येतील. 
- डॉ. यशवंत गुप्ता, संचालक, एनसीआरए, पुणे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()