बारामती : शहरातील भाजपच्या कार्यालयाबाहेरील फलकाला आज काळे फासण्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळास भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
दरम्यान या संदर्भात भाजपचे प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे यांनी ही घटना दुर्देवी असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील जे बोलले त्याचा विपर्यास केला गेला, राज्यभर ते प्रसारीत केले गेले, बारामतीतीलच राष्ट्रवादीचा एक गायकवाड नावाचा कार्यकर्ता चंद्रकांत पाटील यांना काळे फासणा-या बक्षीस जाहिर करतो, त्या नंतर लगेचच पाटील यांच्यावर शाईफेक होते, या सर्व शृंखला पवारांशी जोडलेल्या आहेत.
राज्याला जातीयवादाकडे व सामाजिक विषमतेकडे घेऊन जाणारी बीजे ही बारामतीतच आहेत. भाजपच्या बोर्डाला नाही तर भारतीय लोकशाहीला काळे फासण्याचा हा प्रयत्न आहे. पुरोगामित्वाचा प्रचार करणा-या पवार मंडळींनी अंतर्मुख होऊन या कडे पाहिजे. त्यांच्या शहरात भाजपच्या बोर्डाला काळे फासण्याच्या घटनेचा भाजप तीव्र निषेधकरत आहे.
दरम्यान गणेश इंगळे यांनी या संदर्भात सचिन नानासाहेब जगताप व कृष्णा सयाजीराव सोनवणे (दोघेही रा. प्रतिभानगर, आमराई, बारामती) या दोघांना ताब्यात घेतल्याचे नमूद केले. यादोघांनी बोर्डाला काळे फासल्यानंतर याचा व्हिडीओ स्टेटसला ठेवला होता तसेच समाजमाध्यमांवरही प्रसारीत केला होता. या बाबत कायदेशीर कारवाईची प्रक्रीया सुरु केल्याचे इंगळे यांनी सांगितले. भाजपच्या कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.