Pune : बारामतीच्या ESIC हॉस्पिटलसाठी केंद्राकडे शिफारस करणार ;कामगार मंत्री. खाडे

औद्योगिक कंपन्या व कामगार एकत्रितपणे कोट्यावधी रुपये आरोग्य विमा सेवेसाठी दरमहा नियमित शुल्क जमा करत असतात.
कामगार मंत्री सुरेश खाडे
कामगार मंत्री सुरेश खाडे sakal
Updated on

बारामती : येथील मध्ये ईएसआयसीचे 200 खाटांचे हॉस्पिटल मंजूर होण्यासाठी बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने दिलेला प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन असून महाराष्ट्र राज्याचा कामगार मंत्री म्हणून आपण केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे शिफारस करू अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स हॉस्पिटलचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, उद्योजक संजय भोसले, राजाराम सातपुते व प्रवीण जगताप यांच्या शिष्टमंडळाला दिली.

सांगली येथे धनंजय जामदार यांच्या नेतृत्वाखाली बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्र्यांची भेट घेत ही मागणी केली.

नियोजित ईएसआयसी हॉस्पिटल साठी बारामती एमआयडीसीत जागा उपलब्ध होण्यासाठी बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने प्रयत्न करावेत अशी सूचना खाडे यांनी यावेळी केली.

धनंजय जामदार यांनी सांगितले की बारामती सह आसपासच्या तालुक्यांमध्ये ईएसआयसी कडे नोंदणीकृत औद्योगिक कामगारांची संख्या लाखाहून अधिक असून दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. बारामतीच्या शंभर किलोमीटर मध्ये ईएसआयसी हॉस्पिटल नाही.

औद्योगिक कंपन्या व कामगार एकत्रितपणे कोट्यावधी रुपये आरोग्य विमा सेवेसाठी दरमहा नियमित शुल्क जमा करत असतात. या माध्यमातून कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना निशुल्क व दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणे अपेक्षित आहे, परंतु बारामती परिसरात ईएसआयसी हॉस्पिटल नसल्याने कामगार या हक्काच्या वैद्यकीय सुविधा पासून वंचित राहत आहेत. नाईलाजाने त्यांना खाजगी दवाखान्यांची सेवा घ्यावी लागत आहे.

या पार्श्वभूमीवर औद्योगिक कामगारांच्या आरोग्य सेवेच्या कमतरतेचा विचार करून बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने बारामती मध्ये ईएसआयसी चे 200 बेडेड हॉस्पिटल उभारण्याची केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे मागणी केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.