Pune : बारामतीचे प्रांजल चोपडे आयएफओएस परीक्षेत देशात तेरावे

मूळचे बारामतीकर असलेले प्रांजल प्रमोद चोपडे यांचे शालेय शिक्षण विद्या प्रतिष्ठान सीबीएससी शाळेमध्ये झाले. त्यानंतर अकरावी बारावी त्यांनी बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये केली.
Pune
Punesakal
Updated on

Pune - येथील प्रांजल प्रमोद चोपडे यांनी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या राष्ट्रीय पातळीवरील ऑल इंडिया सर्व्हिसेस च्या परीक्षेमध्ये देशात 13 वा क्रमांक प्राप्त केला आहे.

बारामतीतून इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये देशात तेराव्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारे प्रांजल प्रमोद चोपडे हे पहिलेच बारामतीकर ठरले आहेत. या निमित्ताने बारामतीच्या युवकांकडून राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश मिळवण्याची एक उज्वल परंपरा सुरू झाली आहे.

Pune
Mumbai : मुंबईतील पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली! राष्ट्रीय उद्यानाला ४ दिवसांत ६ हजार नागरिकांची भेट

मूळचे बारामतीकर असलेले प्रांजल प्रमोद चोपडे यांचे शालेय शिक्षण विद्या प्रतिष्ठान सीबीएससी शाळेमध्ये झाले. त्यानंतर अकरावी बारावी त्यांनी बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये केली. त्यानंतर पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये त्यांचे उच्च शिक्षण झाले.

Pune
Mumbai News : आली लहर केला कहर! पठ्ठ्याने ट्रक थेट समुद्रातच घुसवला

गेल्या पाच वर्षांपासून ते या परीक्षेचा सातत्याने अभ्यास करीत होते. तीन प्रयत्नात अपयश आल्यानंतर देखील त्यांनी जिद्द व चिकाटी न सोडता अधिक खडतर परिश्रम करून चौथ्या प्रयत्नात यश संपादन केले. देशात तेराव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

आज त्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर बारामती शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यांच्या घरी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आज मित्रपरिवाराची मोठी गर्दी झाली होती.

Pune
Mumbai Local Train : आता मोबाईल युटीएस अँपमधील तिकीटच दाखवा, अन्यथा...

आपले शिक्षक कुटुंबीय व मित्रमंडळी यांच्या सहकार्यामुळे या परीक्षेत आपण हे उत्तुंग यश मिळवू शकलो, अशी प्रतिक्रिया प्रांजल चोपडे यांनी दिली आहे. भारतीय प्रशासन सेवेत आयएएस व आयपीएस या दर्जाची आयएफओ एस सेवा समजली जाते. बारामतीच्या प्रतीक जराड यांनीदेखील यापूर्वी आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

फोटो बारामती भारतीय प्रशासन सेवेची आयएफओएस ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर प्रांजल चोपडे यांचे अभिनंदन करताना त्याचे कुटुंबीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.