Pune : बार्टी आणि वाडिया महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार; स्पर्धा परीक्षांचे मिळणार मोफत प्रशिक्षण

बार्टी ही सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाची स्वायत्त संस्था आहे.
Pune
PuneSakal
Updated on

Pune - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने (बार्टी) अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी बॅंक, रेल्वे, एलआयसी आणि इतर परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयात पुढील सहा महिने कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे.

Pune
Pune : शिक्रापूरच्या महाविद्यालयाचा गलथान कारभार; B.Com चे विद्यार्थी झाले नापास

बार्टी ही सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेमार्फत राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी बँक, रेल्वे एल आय सी आणि इतर परीक्षा (आयबीपीएस) तसेच पोलिस आणि लष्कर भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात.

आयबीपीएसमार्फत प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी, विशेष अधिकारी अशा पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

Pune
Mumbai News : मुंबई, दिल्ली एअरपोर्टवर बॉम्बस्फोट होऊन मोठी दुर्घटना घडणार...; कंट्रोल रुमला फोन अन्...

त्या अनुषंगाने संबंधित परीक्षेत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्याचा टक्का वाढविण्यासाठी बार्टी आणि मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालयांशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती ‘बार्टी’चे  महासंचालक सुनील वारे यांनी दिली.

या प्रशिक्षणासाठी २५ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार असून प्रवेश परीक्षा १० सप्टेंबर रोजी नेस वाडिया महाविद्यालयात आयोजित केली आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर, डॉ. लक्ष्मण भैसाने, सहाय्यक प्राध्यापक आणि समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी ३० टक्के जागा महिलांसाठी, चार टक्के जागा ‘दिव्यांग’ विद्यार्थ्यांसाठी, पाच टक्के जागा अनुसूचित जाती अंतर्गत वंचित जाती मधील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असणार आहेत.

Pune
Mumbai : मुंबईतील 'या' महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; 5 किलोमीटर पर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

प्रशिक्षण कार्यक्रमाचे स्वरूप -

- विद्यार्थ्यांना प्रती महिना सहा हजार रुपये विद्यावेतन

- शैक्षणिक साहित्यासाठी एकरकमी पाच हजार रुपये

- पात्रता : १२ वी उत्तीर्ण

- विद्यार्थी संख्या : १००

- प्रशिक्षण कालावधी : सहा महिने

- अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://barti.maharashtra.gov.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.