Pune School Crime: पुण्यातील भवानी पेठ भागातील एका नामांकीत शाळेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. नुकताच बदलापूर इथं साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकलींवर शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याकडून अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी रेल रोको केला आहे.
यापार्श्वभूमीवर पुण्यातल्या घटनेनं महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. विशेष म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्टलाच ही घटना घडली आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.