भोर : झोपेच्या गोळ्या चढ्या दराने विकणाऱ्या मेडिकल दुकानावर कारवाई

नशा येणा-या 93 रुपये किंमतीच्या गोळ्यांची तब्बल 500 रुपयांना विक्री, पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
crime
crimesakal
Updated on

भोर (पुणे) : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मेडिकल दुकानातून नशा येणा-या झोपेच्या गोळ्या मुलांना चढ्या दराने देत असल्याबद्दल भोरमधील मेडिकल दुकानचालकास पोलिसांनी रंगेहात पकडले. शहरातील राजवाडा रोडवरील भोरेश्वर मेडिकल दुकानाचे मालक चेतन नंदकुमार विसापुरे (वय 36) असे कारवाई करण्यात आलेल्या दुकानचालकाचे नाव असून शनिवारी (ता.9) सायंकाळी याच्यावर कारवाई करण्यात आली.

भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने भोरचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे व पोलिस उपनिरीक्षक बळीराम सांगळे यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोरेश्वर मेडिकलमधून नशा येणा-या झोपेच्या गोळ्या सर्रास मिळत असल्याची खबर पोलिसांना लागली. लहान मुले नशा करण्यासाठी या गोळ्यांचा वापर करीत असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली.

crime
दौंड - सुर्या लाॅजवर खुलेआम वेश्याव्यवसाय; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

उपविभागीय पोलिस पथकातील श्रीकांत वडणे व सोमेश राऊत यांनी अन्न व प्रशासन निरीक्षक अतिश सरकाळे व विजय नांगरे यांच्या सहकार्याने मेडिकल दुकानात बनावट ग्राहक पाठविले. दुकानचालक चेतन विसापुरे याने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशा येणा-या झोपेच्या गोळ्या जास्त दराने दिल्या. 93 रुपये 81 पैसे किंमत असलेल्या 15 गोळ्यांच्या पाकीटासाठी तब्बल 500 रुपये घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. अन्न व प्रशासन निरीक्षक अतिश सरकाळे व विजय नांगरे यांनी चेतन विसापुरे विरोधात पुढील कारवाई सुरु केली. यापुढे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून संबंधीत मेडिकल दुकानचालक चेतन विसापुरे याच्यावर काय कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अन्न न प्रशासन विभागाचे दुर्लक्ष

अन्न व प्रशासन विभागाच्य़ा औषध निरीक्षकाकडून भोरमधील दुकानांची वेळोवेळी तपासणी केली जाते. परंतु तपासणीत फक्त ठरावीक औषधांचा साठाच तपासला जातो. त्यामुळे ही तपासणी केवळ नावापुरतीच असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक मेडिकल दुकानांमधून जनरल स्टोअर्सप्रमाणे सर्व साहित्याची सर्रास विक्री केली जाते. मेडिकल दुकानांमधून शासकीय नियमाप्रमाणे औषधांची खरेदी-विक्री करण्यावर औषध निरीक्षकांचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.