Pune : दुष्काळग्रस्त खेड्यातील बिपीन चौधरी या तरुणाने झुरळ मारण्यासाठी तयार केलेल्या हर्बल कीटकनाशकाला मिळाले पेटंट

इतरही काही उत्पादनांना पेटंट मिळण्यासाठी त्यांनी प्रस्ताव सादर केले आहे.
pune
punesakal
Updated on

पारगाव - आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील शिरदाळे या दुष्काळग्रस्त खेड्यातला सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा बिपीन पंढरीनाथ चौधरी या तरुणाने केमिकल विरहीत हर्बल पेस्ट कंट्रोलवर संशोधन करून गावातच स्वतः विकसित केलेली हर्बल कीटकनाशक उत्पादित करण्याचा उद्योग सुरू केला. झुरळ मारण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या १०० टक्के हर्बल कीटकनाशकाला भारतात पेटंट मिळाले आहे.

गावी फक्त फक्त शेती तीही पावसावर अवलंबून पाऊसही बेताचाच घरची परिस्थिती जेमतेमच अशा परिस्थितीत काही तरी करायचं ही जिद्द बिपीन चौधरी यांच्या मनात होती. जे करायचं ते स्वतःपुरतं नाही तर आपल्यासोबत आपल्या घराचं आणि गावाचंही भलं व्हायला हवं यासाठी तो प्रयत्नरत होता. त्यांच्या घरी आई, वडील, आजी, आजोबा आणि दोन बहिणी.

गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण झाले त्यांनतर शेजारील धामणी गावात बारावीपर्यंत शिक्षण. बारावीनंतर राजगुरुनगर येथे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. कौटंबिक अडचणींमुळे बी.एस्सी.पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. चौधरी यांनी स्थापन केलेल्या 'हर्बल पेस्ट कंट्रोल इंडिया प्रा. लि.’या उद्योगाला भारत सरकारच्या 'स्टार्टअप इंडिया' कडून मान्यता मिळाल्यानंतर २०१२ ला त्यांनी स्वतः काही हर्बल कीटकनाशके निर्माण करून त्यांचा पेस्ट कंट्रोलमध्ये वापर सुरू केला होता. याने मिळणारा परिणाम तर

pune
Pune Traffic-Navratri 2023 : नवरात्र उत्सवानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल

चांगला होताच, शिवाय लोकांचा केमिकलचा होणारा त्रासही कमी झाला. केमिकल पेस्ट कंट्रोलचे अनेक दुष्परिणाम आहेत त्याउलट 'हर्बल पेस्ट कंट्रोलचा दुष्परिणाम नाही त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत गेला यामध्ये त्यांना यश येत गेलं. त्यांनी २०१६-१७ मध्ये स्वत:च्या गावातच स्वतः विकसित केलेली हर्बल कीटकनाशकं उत्पादित करण्याचा उद्योग सुरू केला. यातून गावातील काही तरुणांना रोजगार मिळाला बिपीन चौधरी यांनी झुरळ मारण्यासाठी तयार केलेल्या हर्बल कीटकनाशकाला भारतात पेटंट मिळाले आहे.

pune
Sada Sarvankar : आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

इतरही काही उत्पादनांना पेटंट मिळण्यासाठी त्यांनी प्रस्ताव सादर केले आहे. या उद्योगासाठी त्यांना त्यांची पत्नी व मुलांचे सहकार्य मिळत आहे केवळ आर्थिक पाठबळ न मिळाल्याने त्यांनी संशोधन केलेल्या जागतिक स्तरावरील हर्बल कीटक नाशके जिल्हा तसेच राज्याच्या बाहेर नेऊ शकलो नसल्याची खंत बिपीन चौधरी यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.