Pune : दौंड बाजार समितीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा

एप्रिल २०२३ मध्ये १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप व मित्रपक्ष पुरस्कृत जनसेवा पॅनेलने ०९ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलने ०९ जागा जिंकल्या होत्या.
BJP
BJPesakal
Updated on

प्रफुल्ल भंडारी

दौंड - दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाजप समर्थक गणेश जगदाळे (लिंगाळी) व उपसभापतिपदी शरद कोळपे (दहिटणे) यांची निवड झाली आहे. १९५९ मध्ये स्थापन झालेल्या दौंड बाजार समितीवरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कमी होऊन पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आहे.

BJP
Mumbai Police : ट्विटरद्वारे मुंबईत घातपाताची मुंबई पोलिसाना धमकी.. नांदेडमधून एकाला अटक...

एप्रिल २०२३ मध्ये १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप व मित्रपक्ष पुरस्कृत जनसेवा पॅनेलने ०९ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलने ०९ जागा जिंकल्या होत्या. दरम्यान मे महिन्यात व्यापारी मतदारसंघातील शेतकरी विकास पॅनेल मधून निवडून आलेले संचालक संपतराव निंबाळकर यांचे निधन झाले. त्यानंतर जनसेवा पॅनेलचे ०९ व शेतकरी विकास पॅनेलचे ०८ , असे संख्याबळ झाले.

दौंड बाजार समिती सभागृहात आज दोन्ही पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. प्राधिकृत अध्यासी अधिकारी म्हणून सहायक निबंधक (सहकार) हर्षित तावरे यांच्या देखरेखीत ही निवडणूक झाली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रकाश शितोळे यांनी काम पाहिले. सभापतिपदासाठी जनसेवा पॅनेलचे गणेश जगदाळे व शेतकरी विकास पॅनेलचे बाळासाहेब शिंदे यांनी अर्ज दाखल केले. गुप्त पध्दतीने झालेल्या मतदानात गणेश जगदाळे यांना ९ तर बाळासाहेब शिंदे यांना ८ मते पडली.

BJP
Pune Ring Road : रिंगरोडवर १५ उड्डाणपूल, पाच बोगदे! पहिल्या टप्प्यातील भूसंपादनासाठी प्रस्ताव

उपसभापतिपदासाठी जनसेवा पॅनेलचे शरद कोळपे व शेतकरी विकास पॅनेलच्या वर्षा मोरे यांच्यात लढत झाली. शरद कोळपे यांना ९ तर वर्षा मोरे यांना ८ मते पडली. मतमोजणीनंतर हर्षित तावरे यांनी सभापतिपदावर गणेश जगदाळे व उपसभापतिपदी शरद कोळपे यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

BJP
Mumbai Trans Harbour Link: ३०-३५ वर्षे केवळ चर्चा होती; हा पूल फक्त मोदींमुळे उभा राहिला, देवेंद्र फडणवीस

निवडीनंतर भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते नूतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. गणेश जगदाळे हे लिंगाळी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य आहेत. शरद कोळपे हे दहिटणे सोसायटीचे माजी चेअरमन आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.