MP Girish Bapat Passes Away: गिरीश बापटांचा पराभव करायला थेट राहुल गांधी पुण्यात आले होते

MP Girish Bapat Passes Away
MP Girish Bapat Passes Awayesakal
Updated on

MP Girish Bapat Passes Away : राज्यातील भाजपच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक नाव म्हणजे गिरीश बापट हे नेहमीच चर्चेत असायचे.

गिरीश बापट यांनी राजकारणाची सुरूवात जनसंघापासून केली. ते मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. नगरसेवकापासून राजकारण सुरू झाले.

1995 पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले. 2019 च्या पुणे लोकसभा मतदारसंघातून आजवरचा इतिहास मोडीस काढत गिरीश बापट खासदार झाले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत बापट यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा ३ लाख २४ हजार ६०८ मतांनी पराभव करीत दणदणीत विजय मिळाविला. पुण्याच्या राजकारणात आजही बापटांचा दबदबा आहे.

बापट यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार, मंत्री आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.(Latest Marathi News)

MP Girish Bapat Passes Away
Girish Bapat Passed Away : भाजपचा किंगमेकर हरपला! खासदार गिरीश बापट यांचं पुण्यात निधन

कोण होते गिरीश बापट? (Who is Girish Bapat?)

गिरीश बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांनी माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत घेतले.

बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर 1973 मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. त्यानंतर दोन वर्षांतच आणीबाणीमध्ये 19 महिन्यांचा कारावास झाला ते नाशिक जेलमध्ये भोगला.(Marathi Tajya Batmya)

गिरीश बापट हे पुण्याच्या राजकारणात चाणक्य म्हणून ओळखले जात. राज्यात सत्त कोणाची ही असली तरी आपले काम साधून घेण्याची कला गिरीश बापट यांना उत्तम अवगत होती.

तगडा लोकसंपर्क ही गिरीश बापट यांची जमेची बाजू मानली जात. सगळ्या पक्षातील नेत्यांसोबत प्रेमाने, मिळून मिसळून राहण्याच्या स्वभावामुळे गिरीश बापट यांना राजकारणात अडचण आली नाही.

गिरीश बापट यांचा पारंपरिक मतदारसंघ कसबा होता. तेथून ते सलग पाच वेळा आमदार राहिले. त्यामुळे मतदारसंघावर मजबूत पकड आहे. त्यांच्या शब्दा बाहेर जाणार नाहीत अशी कार्यकर्ते त्यांनी तयार केली आहे.

त्यामुळे आता लागलेल्या निवडणुकीत भाजप बापटांना सोडून प्रचार करू शकत नाहीत. कसब्यात ब्राह्मण मतदारांचा टक्का मोठा आहे. आणि बापट यांच्या शब्दाला मानणारा आहे.

MP Girish Bapat Passes Away
MP Girish Bapat Death: गिरीश बापट यांच्या निधनाची माहिती मिळताच चंद्रकांत पाटील पुण्याकडे रवाना

गिरीश बापट यांची पुण्याच्या राजकारणात जादू किती हे पहायचं झालं तर एकच उदाहरण बस आहे.

2009 च्या विधानसभा निवडणुका होत्या. पुण्यातल्या कारभाऱ्यांनी भाजपला हरवून कसबा जिंकायचंच अस ठरवलेलं. गिरीष बापट यांच्या विरोधात काँग्रेसने रोहित टिळक यांना उमेदवारी दिली. त्यावेळी रोहित टिळक यांच्या प्रचाराला खुद्द राहुल गांधी आले.

राहुल गांधी कसब्याच्या जागेसाठी प्रचाराला येणं मोठी गोष्ट होती. काँग्रेसचा उत्कर्षाचा काळ होता. त्यात स्वतः टिळकांचा पणतू निवडणुकीत उभा राहतोय आणि नेहरूंचा पणतू प्रचाराला म्हणल्यावर ही निवडणुक रोहित टिळक मोठ्या मतांनी खिशात घातलील असं वाटत होतं.

पण कसब्यातल्या मतदारानी पुन्हा हुलकावणी दिली, गिरीष बापट मोठ्या फरकाने विजयी झाले होते. रोहित टिळक चक्क तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()