भरधाव चारचाकीची बस थांब्याला धडक, दोन तरुण ठार, दोघे गंभीर जखमी

वडगाव शेरी येथील नगर रस्ता बीआरटी मार्गावर खराडी बाह्यवळण चौकाजवळ रात्री झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.
भरधाव चारचाकीची बस थांब्याला धडक, दोन तरुण ठार, दोघे गंभीर जखमी
भरधाव चारचाकीची बस थांब्याला धडक, दोन तरुण ठार, दोघे गंभीर जखमीSakal
Updated on

वडगाव शेरी : नगर रस्ता बीआरटी मार्गावर खराडी बाह्यवळण चौकाजवळ रात्री झालेल्या अपघातात दोन युवक ठार झाले आहेत. दोन तरुण गंभीर जखमी आहेत. भरधाव चारचाकीने बस थांब्याला धडक दिल्यामुळे हा अपघात घडला.

विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास चार चाकी (एम एच १२ क्यूएफ ९३६३) मधून चौघे जात होते. चार चाकीचा वेग जास्त होता. बीआरटी मार्गातून जाताना चार चाकी खराडी बाह्यवळण चौकाजवळ बीआरटी बस थांब्यास धडकली.

चालक संकेत भुजबळ ( वय 22, रा. साई नगरी, चंदनगर, खराडी) आणि ओम पवळे (वय 17, किनारा हाउसिंग सोसायटी, कसबा पेठ) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. तर गौरव साठे ( वय 22, रा. वाघोली) आणि प्रफुल्ल अंकमंची (वय 21, राहणार बिडी कामगार, चंदनगर) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर खराडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चौघेही तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. चार चाकीचा वेग सुमारे 140 किमी च्या आसपास होता. काही प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात पाहिला. चारचाकी चालक मयत संकेत भुजबळ यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती विमानतळाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत जाधव यांनी दिली आहे. यातील मयत संकेत भुजबळ हा तरुण भाजपा पदाधिकारी होता. इतर महाविद्यालयीन युवक होते.

भरधाव चारचाकीची बस थांब्याला धडक, दोन तरुण ठार, दोघे गंभीर जखमी
Ratnagiri Dam Mishap :भगदाड पडल्याचे वृत्त सकाळने केले होते प्रसिद्ध 

बीआरटी मार्गात घुसखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यावर पोलीस प्रशासन आणि महापालिका दोघांचेही नियंत्रण राहिलेले नाही. बीआरटीतील घुसखोरीबाबत सकाळने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. बीआरटी मार्गातून घुसखोरी करणार्यांवर दंडाची तरतूद आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही.

  • संकेत भुजबळ (पांढरा शर्ट)

  • ओम पवळे (पिवळा शर्ट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.