Pune : मार्केटयार्डातून मावळला जाणार्‍या बस होणार बंद; कोथरूड मधून बस सुरू होणार

मार्केट यार्डातून मावळातील घोटावडे, खारावडे, लवारडे, माले, पौड, कातर खडक, मारणेवाडी, कोळवन आदी ठिकाणी जाण्यासाठीच्या मार्गावर एकूण एकोणीस बस कार्यरत असून आठ बस मुक्कामी असतात तर अकरा बस मार्केट यार्डातून मार्गावर जातात.
 bus
bus esakal
Updated on

बिबवेवाडी - शहराची धान्य, फुले व शेतमालाची मुख्य बाजारपेठ असलेल्या मार्केट यार्डातून मावळात जाणाऱ्या पीएमपीएल च्या बसची सेवा येत्या 1 जून पासून बंद होणार असून कोथरूड बस डेपोतून हि सेवा सुरु करण्यात येणार आहे, त्यामुळे मावळातून येणार्‍या शेतकर्‍यांना मार्केटयार्डात थेट बसने येता येणार नाही त्यांना कोथरूड येथे उतरून पुन्हा मार्केट यार्डची बस पकडून यावे लागणार आहे.

 bus
Pune Rain : ढगांच्या गडगडाटासह पुण्यात पावसाला सुरूवात...

मार्केट यार्डातून मावळातील घोटावडे, खारावडे, लवारडे, माले, पौड, कातर खडक, मारणेवाडी, कोळवन आदी ठिकाणी जाण्यासाठीच्या मार्गावर एकूण एकोणीस बस कार्यरत असून आठ बस मुक्कामी असतात तर अकरा बस मार्केट यार्डातून मार्गावर जातात, सर्व बसच्या एकूण साठ फेर्‍या मधून अकरा हजार प्रवासी दररोज बस मधून प्रवास करतात.

मार्केटयार्डातून स्वारगेट, डेक्कन, कोथरूड, चांदणी चौक मार्गे बस पुढे जातात त्यामुळे शहरातून मावळात जाताना शहरा अंतर्गत प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते त्या तुलनेत मावळातून मार्केट यार्डला येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे, मार्केटला येणारी बस बंद होणार असल्याने शेतकऱ्यांना त्रास होणार आहे,

 bus
Mumbai : गोरेगाव भागात चाकूने भोसकून एकाची हत्या; मारेकरी अटकेत

अनेक शेतकरी किरकोळ शेतीमाल, साहित्य देण्याघेण्यासाठी मार्केटला येतात परंतु कोथरूड पर्यंतच बस येणार असल्यामुळे पुन्हा दुसरी बस पकडून मार्केटला यावे लागणार त्यामुळे वेळेचा अपव्यय व दुहेरी कष्ट करावे लागणार आहे.प्रताप ढमाले ( आंबडवेट, रहिवासी ) : घोटावडे वरुन थेट मार्केट यार्डला जाणारी बस बंद होणार असल्याने किरकोळ शेतीमाल घेऊन दोन दोन बस चा कष्टप्रद प्रवास करावा लागणार आहे.

 bus
Mumbai Fraud : मुलांना रेल्वेत नोकरीच्या आमिषाने शेतकऱ्याची 12 लाखांची फसवणूक; पोलिसांकडून तपास सुरू

मोहन दडस ( अप्पर बस डेपो, आगार व्यवस्थापक ) : मार्केटयार्ड ते कोथरूड दरम्यान प्रवासी संख्या जास्त आहे, गर्दीच्या रस्त्यावरून बस जाते त्यामुळे एक फेरी पूर्ण करण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ लागतो त्यामुळे कोथरूड येथून बस सेवा सुरु केल्यास प्रवाशांना कमी वेळेत बस उपलब्ध होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.