पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघाताची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. या प्रकरणानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे दिसून आले. पण पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार हे या प्रकरणापासून लांब असल्याचे दिसून आले. या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी यांनी अजित पवारांच्या नार्को टेस्टची मागणी केली. त्यावरती आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
नार्को टेस्टवर बोलताना अजित पवार म्हणाले, "माझी नार्को टेस्टची तयारी आहे. पण मी नार्को टेस्टमध्ये क्लिअर निघालो तर तिने(अंजली दमानियांनी) पुन्हा कुठे पुढे यायचं नाही. गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा", अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांचा फोन जप्त करून त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती.
अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेत अजित पवार फार वेगळे होते. खरंतर त्यांनी सरळ सरळ पुण्याच्या मुद्द्यावर हात घालायला पाहिजे होता . पण इकडच्या तिकडच्या गोष्टी मांडल्यानंतर पुण्याच्या घटनेवर थोडेसे बोलले. ज्या पद्धतीने ते बोलले आपण सर्वांनी पाहिले. त्यांच्या मनासारखे झाले नाही तर ते भडकणारे अजित पवार किंवा त्यांना जे जे हवं तेथे झाले नाही तर ते विरोधी पक्षावर देखील भडकतात.
त्यांची देहबोली अतिशय गांगरल्यासारखी होती ते धादांत खोटे बोलत होते. जो मी आधी प्रश्न मांडला होता त्यांना या प्रश्नावर बोलायला चार दिवस का लागले. कालचा त्यांचा जो तोरा होता त्यावरून मला असं वाटतं ते धादांत खोटे बोलत आहे त्यांची नार्को टेस्ट सुद्धा झाली पाहिजे त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी झाली पाहिजे आणि पूर्ण सत्य बाहेर आले पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.