Pune: मोठी बातमी, पुण्यात पकडली लाखोंची रोकड! मालक नक्की कोण?

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर वाहन तपासणीदरम्यान लाखोंची रोकड जप्त
Pune
Punesakal
Updated on

Latest Crime News: येथील विधानसभा मतदारसंघ हद्दीतील द्राक्ष संशोधन केंद्रासमोर स्थिर सर्वेक्षण पथकाकडून एका वाहनातून आणली जाणारी सुमारे १३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पथकाकडून वाहने तपासणी करीत असताना ही कारवाई करण्यात आली.

स्थिर सर्वेक्षण पथकाकडून पुणे सोलापूर महामार्गावर वाहनांची तपासणी करण्यात येत होती त्यावेळी पथकाला एका क्रेटा वाहनात १२ लाख ९९ हजार ५०० रुपये आढळून आले.वाहनातील वसीऊल्ला वलीउल्ला खान याला या रक्कमेबाबत पथकाने विचारणा केली असता, त्याने ही रक्कम आपल्या भंगार व्यवसायाची असल्याचे सांगीतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.