पुणे : राज्याचे धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी वादरहीत बदल अहवाल (चेंज रिपोर्ट) निकाली काढण्यास ३० डिसेंबरपर्यंत राज्यव्यापी मोहिमेचे आयोजन केले होते. या विशेष मोहिमेत एकूण आठ विभागांमध्ये पुणे विभागाने ४ हजार १२० प्रकरणे निकाली काढून संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांकावर आपली मोहोर उमटवली आहे. पुणे विभागांतर्गत नगर, सोलापूर, सातारा आणि पुणे शहर, जिल्हा अंतर्भूत आहेत. मुंबई विभागात सर्वाधिक १५ हजार ३४८ विनावाद प्रकरणे प्रलंबित होती. तिथे केवळ २ हजार ९०८ प्रकरणात निकाल होऊ शकले. मात्र, पुणे विभागात त्याखालोखाल ९ हजार ११ प्रकरणे प्रलंबित असताना सुमारे ५० टक्के बदल अहवाल निकाली काढण्यात यश आले.(Pune Charity Department)
धर्मादाय सह आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मादाय उपायुक्त राहूल मामू, सहायक आयुक्त -१ अमरदीप तिडके, सहायक आयुक्त -२ राहूल चव्हाण, सहायक आयुक्त -३ राणी मुक्कावार आणि सहायक आयुक्त -४ प्रशांत चव्हाण यांनी ही कार्यवाही पार पाडली. यापैकी सहाय्यक आयुक्त -२ राहूल चव्हाण यांनी सर्वाधिक ९०३ बदल अहवाल निकाली काढले.
या विशेष मोहिमेअंतर्गत प्रलंबित परंतु वादग्रस्त नसलेले बदल अहवाल निकाली काढण्याबाबत पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वकिलांनी सकारात्मक भूमिका घेऊन पक्षकारांचे प्रबोधन केले. संस्थांच्या विश्वस्तांनीही अहवालाबाबत कागदपत्रांची पूर्तता केली. अधिकाऱ्यांचे प्रयत्न आणि कार्यपद्धतीत समन्वय यामुळे पुणे विभागाने प्रथम क्रमांक मिळवला.
- ॲड. शिवराज कदम जहागीरदार अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.