कॅन्टोन्मेट - साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सारसबाग येथील पुतळ्यास सकाळपासून विविध पक्ष , सामाजिक संघटना , नेत्याकडून सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देऊन अभिवादन केले.
भारतातील पहिल्या छायाचित्र प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट देऊन प्रदर्शन पाहिले. प्रदर्शनाचे शिल्पकार संजय कांबळे, श्रीधर कांबळे यांचा मुक्तकंठाने गौरव केला .
यावेळी पुणे शहर जिल्हा मातंग समाज जयंती महोत्सव समितीचे स्वागत अध्यक्ष पंढरीनाथ आढगळे, सचिव दयानंद आडगळे, बापूसाहेब पाटोळे लोकसेवा संस्था कार्याध्यक्ष रवी पाटोळे, आमदार सुनिल कांबळे ,दिलीप कांबळे ,भीमराव साठे, डॉ भरत वैरगे आदी उपस्थित होते.
प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद -
पुणेे शहर जिल्हा मातंग समाज, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती जयंती महोत्सव आणि बापूसाहेब पाटोळे लोकसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोचे भारतातील पहिले छायाचित्राचे प्रदर्शन भरवण्यात आले.
यावेळी सर्व पुरोगामी पक्ष, विविध दलित संघटना व मातंग समाजातील अनुयायाने प्रदर्शन पाहण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत या प्रदर्शनाचे कौतुक केले.
सकाळ पासुन आनंददायी वातावरणात प्रथमच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा जल्लोष सुरू होता. तसेच विविध राजकीय पक्षातील व पुरोगामी विविध संघटनेकडून अभिवादन करण्यासाठी गर्दी केली गेली.
- गायानातून सांस्कृतिक प्रबोधन
दलित स्वयंसेवक संघाच्या वतीने अभिवादन
अण्णाभाऊ साठे कला व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने
अण्णाभाऊ यांच्यावर भावगीते, लोकगीते, शास्त्रीय संगीत सादर करून सांस्कृतिक प्रबोधन करण्यात आले. दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाहिरांनी गायन वादन करुन प्रबोधन केले.
यावेळी अध्यक्षस्थानी दलित संघाची माजी अध्यक्ष दादासाहेब सोनवणे, राजू धडे, लक्ष्मण लोंढे, अध्यक्ष संतोष माने,सुजित रणदिवे,लोकशाहीर सदाशिव भिसे उपस्थित होते. भिसे हे गेल्या 32 वर्षापासून कार्यक्रम राबवित आहे.
साडे तीन वर्ष सत्यशोधक नाटकात त्यांनी शाहीर म्हणून काम केले आहे. यावेळी ढोलक वादक पोपट गुलाब लोंढे, सनई वादक लक्ष्मण चव्हाण, हलगी वादक वसंत राजगुरू, सनई वादक शंकर कसबे, ताशा वादक आप्पा सोळशे, पेटीवादक आदिनाथ गाडे यांनी गायन केले.
- विद्यार्थ्यांचे चित्रकलेतून अनोखे अभिवादन
नेताजी सुभाष चंद्र बोस सैनिक बॉईज हायस्कूलच्या वतीने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यास्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे चित्र काढून त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.
विविध राजकीय सामाजिक संघटनेच्या वतीने अभिवादन -
दलित युवा व ॲड राहिल मलिक यांच्या संयुक्त विद्यमाने चहा आणि नाष्टाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन ॲड राहिल मलिक व अनिल अडागळे यांनी केले.
-आरपीआयच्या वतीने अभिवादन
आरपीआयच्यावतीने शहर अध्यक्ष शैलेश चव्हाण, परशुराम वाडेकर, सुनीता वाडेकर, माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, बाळासाहेब जानराव, मातंग युवक आघाडीचे विरेन साठे
बाळासाहेब शेलार,अंबादास कोलते, अमित वर्मा,अशोक जगताप,रवी क्षीरसागर, रविराज चव्हाण, शंकर पटेकर, रोहित कांबळे यांनी अभिवादन केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले )कार्याध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र, निलेशभाऊ आल्हाट यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन सोमनाथ जाधव ,जेष्ठ साहित्यिक संपत जाधव, युवा नेते विनोद वैरागर, रिपाई युवा नेते अशोक खंडाळे, सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीचे ऍड अरविंद तायडे, वसंत साळवे, किशोर लष्करे, ऍड,किरण कदम, विवेक लोंढे,दीपक ओव्हाळ आदी उपस्थित होते. यावेळी सत्यशोधक ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना "" मरणोत्तर भारतरत्न'" हा किताब मिळालाच पाहिजे. अशी मागणी करण्यात आली.
फुले आंबडेकर लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद अहिरे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस अमित मोरे, दलित पॅंथर पुणे शहराध्यक्ष प्रकाश साळवे, दलित पॅंथर सरचिटणीस विठ्ठल असतं सेदलित पॅंथर सरचिटणीस विठ्ठल केदारी, राहुल सोनवणे यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कृती समिती व एकता प्रतिष्ठानच्या वतीने बारा हजार किलोचे अन्नदान वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन ललित तिंडे, सारंग सराफ, श्रीधर चव्हाण, संदेश काथवटे, विजय राजपूत, संदीप वाघमारे, प्रल्हाद गवळी आदींनी केले.
भाजपा कामगार मोर्चा पुणे शहर च्या वतीने पाणी आणि खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी सरचिटणीस निलेश भालेराव, विशाल जाधव, शेखर साठे, निलेश दोडके आदी उपस्थित होते.
मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने चहाचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमोल शिंदे, नेते बाबू वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, बाळासाहेब शेंडगे, किशोर शिंदे, वसंत मोरे, रणजित शिरोळे, गणेश सातपुते, योगेश खैरे, दीपक कुऱ्हाडे, प्रशांत मते, प्रल्हाद गवळी आदी उपस्थित होते.
विश्व हिंदू परिषद व इस्कॉन टँम्पल यांच्या संयुक्त विद्यमाने खिचडी वाटप करण्यात आली. यावेळी महा. प्रांत मंत्री संजय मुद्राळे, संपर्क प्रमुख किशोर चव्हाण, भाग मंत्री विजय कोठळे, सहमंत्री शैलेश काटे, दीपक साठे, प्रकाश पवार, तुषार कुलकर्णी उपस्थित होते.
ज्ञानदीप सोशल फाउंडेशन व विकी पाटोळे यांच्या वतीने वह्या वाटप करण्यात आले. अध्यक्ष यादव पुजारी, निलेश बोधे, अजय पाटोळे, दीप्ती पाटोळे, प्रशांत गौड, नागराज पिल्ले, तानाजी देशमुख उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.