गढूळ पाणी पिल्याने पुणेकरांची पोटं बिघडली

सातत्याने गढूळ पाणी पिल्याने पुणेकरांची पोटं आता बिघडली आहेत. पोटदुखी, बद्धकोष्ठता, पोट जड होणे अशा तक्रारी वाढत असल्याचे दिसते.
Unclean Water
Unclean WaterSakal

पुणे - सातत्याने गढूळ पाणी (Unclean Water) पिल्याने पुणेकरांची पोटं आता बिघडली (Sickness) आहेत. पोटदुखी, बद्धकोष्ठता, पोट जड होणे अशा तक्रारी (Complaint) वाढत असल्याचे दिसते. या पोटाच्या दुखण्यांपासून दूर रहाण्यासाठी ५० ते ६० रुपये मोजून वीस लिटरचे पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात पावसाच्या पाण्यासह मोठ्या प्रमाणात माती वाहून आली आहे. त्यामुळे पुण्यात गेल्या काही आठवड्यांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत होता. पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातील पाणी आता स्थिर होत आहे. त्यातून पाण्याची गढूळता कमी होऊ लागली आहे. महापालिकेच्या प्रयोगशाळेत गढूळता २०० वरून ५० नोफोलोमॅट्रीक टर्बिडीटी युनिटपर्यंत (एनटीयू) कमी झाली आहे. मात्र, या गढूळ पाण्याचा थेट परिणाम आता पुणेकरांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या पोटाच्या तक्रारी वाढल्या असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

Unclean Water
पुणे शहरात शनिवारी १९५ ठिकाणी होणार लसीकरण

घरातील फिल्टर पडले बंद

महापालिकेतर्फे शहराच्या काही भागात शुद्धीकरण करून पाणीपुरवठा केला जातो. पण त्यानंतरही काही नागरिकांनी घरात पाणी शुद्धीकरणासाठी फिल्टर बसवला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या गढूळ पाणी पुरवठ्यामुळे हे फिल्टरही बिघडले आहेत. या फिल्टरच्या दुरुस्तीसाठी किमान तीन ते पाच दिवसांची प्रतीक्षा यादी आहे. गढूळ पाण्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडू नये, यासाठी रोजच्या रोज २० लिटर बाटली बंद पाण्याचा जार विकत घेण्याचा पर्याय पुणेकरांनी स्वीकारला आहे.

डॉ. केदार जोशी यांचे निरीक्षण

  • कोरोनाचा जीवघेणा उद्रेक काही प्रमाणात कमी होत असल्याचे आरोग्य खात्याच्या माहितीवरून दिसते

  • सर्दी, खोकला, ताप अशी कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या काहीशी कमी झाली आहे

  • आता पोटदुखी, पोटात अचानक कळ येणे, पोट जड होणे, बद्धकोष्ठता आणि हगवण होत असल्याच्या तक्रारी घेऊन रुग्ण येत आहेत

  • शहरात, उपनगरांमध्ये या रुग्णांची संख्या वाढत आहे त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे गढूळ पाणीपुरवठा

Unclean Water
रुपीच्या ठेवीदारांसाठी अर्थमंत्र्यांना साकडे

बंद बाटलीतील पाण्याला मागणी

घरातील नळाला सातत्याने होणाऱ्या गढूळ पाणीपुरवठ्याला कंटाळून नागरिकांनी बाटलीबंद पाणी विकत घेण्याचा पर्याय स्वीकारल्याचे दिसते. पुण्यात सर्वसाधारणतः उन्हाळ्यामध्ये बाटलीबंद पाण्याची मागणी वाढते. काही सोसायट्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे तेथील घरांमध्ये पाण्याचे जार रोजच्या रोज पोचविण्यात येतात. पण यंदा पावसाळ्यातही बाटली बंद पाण्याची मागणी सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे, असे निरीक्षण या व्यावसायिकांनी नोंदवले.

‘नागरिकांनो या गोष्टी करा’

पावसाळ्यामुळे गढूळ पाणीपुरवठा होत होता. मात्र, त्याचे प्रमाण आता कमी होत आहे. पुढील आठवड्यात पाणी पुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित आहे. शहराच्या काही भागात काही अंशी गढूळ पाणीपुरवठा होत असला तरीही ते पाणी पिण्यासाठी पूर्णतः सुरक्षित आहे. उकळून गार केलेले आणि गाळून घेतलेले पाणी नागरिकांनी प्यावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी केले आहे.

कोरोनाच्या जीवघेण्या संकटातून सुटकेचा निःश्वास टाकत असतानाच पुणेकरांच्या डोक्यावर जलजन्य आजाराची टांगती तलवार आहे की काय, अशी भीती वाटते. गढूळ पाणी, घरातील बंद फिल्टर यामुळे पाणी विकत घ्यावे लागते. त्यातून महिन्याचा खर्च किमान दीड हजार रुपयांनी वाढला.

- समीर कुलकर्णी, नागरिक

Unclean Water
तोतया पोलिस निरीक्षकाला गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

बाटलीबंद पाणी खरेदी करण्यापूर्वी त्यावर ‘आयएसआय’ शिक्का आहे का, हे आवर्जून बघा. हा शिक्का असलेले पाणी व्यवस्थित प्रक्रिया करून ग्राहकांपर्यंत पोचविले जाते. परवाना नसलेले अनेक जण जारमध्ये पाणी भरून त्याची विक्री करत आहेत. त्यातून फसवणूक होऊ शकते.

- विजयसिंह डुबल, अध्यक्ष, महाराष्ट्र बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

दररोज वीस लिटरचे चार ते पाच जार ठरलेले ग्राहक दुकानातून घेऊन जात होते. पण गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून ही संख्या पन्नासपर्यंत वाढली आहे.

- भरत गेहलोत, किराणा दुकानदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com