Pune : दोन किलोमीटर रस्त्यासाठी अर्धा तास, बिबवेवाडीतील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

नागरिक, कार्यकर्ते स्व:ता वाहतूक कोंडी सोडवत असतात त्यामुळे रस्त्याला वाली कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Pune
PuneSakal
Updated on

बिबवेवाडी - सातारा रस्त्यावरील माणिक दुगड चौकातून सुरु होणार्‍या स्वामी विवेकानंद मार्गासह अंतर्गत रस्त्यावरील चार ठिकाणच्या कामांमुळे बिबवेवाडीकर पुरते वाहतूक कोंडीत अडकलेले असून दोन किलोमीटर अंतरात चार ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे, रस्त्यांच्या कामाकडे ना महापालिका प्रशासनाचे लक्ष ना वाहतूक पोलिसांचे लक्ष,

नागरिक, कार्यकर्ते स्व:ता वाहतूक कोंडी सोडवत असतात त्यामुळे रस्त्याला वाली कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. विवेकानंद मार्गाच्या सुरवातीला प्रेम नगर येथील माणिक दुगड चौकात भुयारी मार्गा शेजारून विवेकानंद मार्गाला जोडणाऱ्या जुन्या रस्त्याचे सीमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे संथ गतीने मुदतीपेक्षा जास्त काळ काम सुरू आहे त्यामुळे चौकात वाहतूक कोंडी होते.

Pune
Best Water Park Near Mumbai :  फॅमिलीसोबत Full On Enjoy करायला मुंबईजवळील या बेस्ट वॉटर पार्कला भेट द्या!

विवेकानंद मार्गावरील गावठाण चौकात भगली हॉस्पिटल चौका कडे जाणार्‍या रस्त्याचे 130 मीटर सीमेंट काँक्रीटकरण करण्याचे काम सुरू आहे, रस्त्याचे अर्धवट काम केले असून येथे वाहने पार्किंग केली जातात त्यामुळे वाहतूक कोंडी होते, रस्त्यावर शाळा आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून शाळेत जावे लागते.

Pune
Best Water Park Near Mumbai :  फॅमिलीसोबत Full On Enjoy करायला मुंबईजवळील या बेस्ट वॉटर पार्कला भेट द्या!

बिबवेवाडी पोलीस ठाण्यापासून संविधान चौकापर्यंत 80 मीटर चा रस्ता सीमेंट काँक्रीट चा करण्याचे काम खूपच संथगतीने सुरू आहे. रस्त्याच्या दुतर्फा अर्धवट कामे झालेली असून त्यातच नव्याने संविधान चौक ते अप्पर बस थांब्यापर्यंत चैत्रबन झोपडपट्टी च्या बाजूने 90 मीटर रस्त्याची एक बाजू सीमेंट काँक्रीटकरणासाठी खोदलेली आहे.

Pune
Pune Theft : ‘माझी आई गावी गेली आहे. मला भूक लागली असून, जेवण द्या’, असे म्हणत चोरटयांनी...

त्यामुळे प्रचंड प्रमाणात दररोज वाहतूक कोंडी चा सामना नागरिकांना करावा लागतो. लेक टाऊन सोसायटी, अप्पर, महालक्ष्मी नगर, सुखसागर नगर, व्हीआयटी हॉस्टेलकडे जाणाऱ्या काही मीटर च्या रस्त्यासाठी अर्धा अर्धा तास वाहतूक कोंडीत वाहने अडकतात.आबा बाबर ( स्थानिक रहिवासी ) : चिंतामणी नगर येथील रस्त्यांचे काम अर्धवट असताना चैत्रबन समोर रस्त्याचे काम सुरू केले आहे.

Pune
Mumbai Black Magic : अमावस्येच्या रात्री कोंबड्याची सुटका, सुशिक्षितांच्या डोंबिवलीत ब्लॅक मॅजिकचा प्रकार

त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली असून अधिकारी दुर्लक्ष करतात, कामाची गती पाहता पावसाळ्या पूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.अमर शिंदे ( कार्यकारी अभियंता पथ विभाग ) : पावसाळी व सांडपाणी वाहिन्यांच्या कामामुळे रस्त्याच्या कामाला विलंब झाला, खोदलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.