Pune : ओतूर शहरात रस्त्यावरील खड्डे अन् पाऊसाच्या पाण्याच्या डबक्यानी नागरीक त्रस्त

त्यात थोडा पाऊस जास्त असेल तर या मार्गाने बाजार समिती व पुढे काळे वस्ती पर्यंत साईड गटार नसल्याने रस्त्याच्या बाजूने पाण्याची डबकी दिसून येतात.
Pune
PuneSakal
Updated on

ओतूर - जुन्नर शहरात पावसाच्या पाण्याने शहरातील मार्गावर पडलेले खड्ड्यात तयार झालेल्या पाण्याच्या डबक्यामुळे नागरीक त्रस्त झाले असून किमान खेड्यामध्ये मुरूम किंवा खडी टाकून त्याची डागडुजी करावी तसेच पाण्याच्या डबक्यानी मच्छराही वाढले असून साथीचे रोग बळावण्याची शक्यता असल्याने औषध फवारणी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे..

जुन्नर तालुक्यातील ओतूर ही एक मोठी बाजारपेठ असून ही ओतूर शहरात साचलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे व खड्ड्यांमळे ओतूर मधीलच नाहीतर ओतूर शहरात कामा निमित्त येणारे इतर गावचे नागरीक ही त्रस्त होत असून ओतूर ग्रामपंचायत प्रशासनाच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारात बाबत नाराजी व्यक्त करत आहे.

Pune
School Closed in Mumbai: मुंबई अन् उपनगरातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; IMDचा अतिवृष्टीचा इशारा

नगर कल्याण महामार्गावरून ओतूर शहरात प्रवेशाच्या मार्गावर पाण्याची डबकी व खड्डे हे नागरिकांचे व वाहन चालकाचे स्वागत करण्यासाठीच संबधीथ प्रशासना कडून ठेवले आहेत की काय असे वाटते.

ओतूर शहरात प्रथम मोनिका चौकातून ग्रामपंचायत कडे व बाजार समिती कडे जाणार्या मार्गाने जर प्रवेश केला तर या सिमेंट रस्त्यावर साईट गटारीची व्यवस्था व्यवस्थीत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची डबकी रस्त्यावरच पहायला मिळतात, या डबक्याच्या पाण्यातूनच आपल्याला जावे लागते.

त्यात थोडा पाऊस जास्त असेल तर या मार्गाने बाजार समिती व पुढे काळे वस्ती पर्यंत साईड गटार नसल्याने रस्त्याच्या बाजूने पाण्याची डबकी दिसून येतात. दुसरे जर तुम्ही नव्या बसस्थानका कडून ओतूर शहरात येत असाल तर बसस्थानकाच्या प्रवेशावर पाण्याची डबकी व खड्डे तुमचे स्वागत करतात.

बसस्थानक परीसरात ते ब्राह्मणवाडा चौक व पुढे पोलीस ठाण्याकडे जाणार्या मार्गा पर्यंत ठिकठिकाणी पाण्याची डबकी व खड्डे दिसून येतात. तर कॉलेज बाजूने ब्राह्मणवाडा चौकात येणाऱ्या मार्गावर ही ओढ्यात मोठमोठे खड्डे पडले आहे. ओतूर शहरातील अंतर्गत रस्ते ही जे नुकतेच एक दोन वर्षात सिमेंट कॉंक्रेटचे करण्यात आले होते त्याची ही दुरावस्था झाली आहे.

Pune
Chh. Sambhaji Nagar : तरुणांना गाठून नशेच्या गोळ्या विकायचा! कारागृहात पोलिसांना म्हणतो, जेवण नको पण...

त्यात पांढरी मारूती मंदिरापासून वरील आळी कडे जाणार्या सिमेंट रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तसेच पानसरे आळी कडे जाणार्या मार्गावर ही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे.

तर कपर्दिकेश्वर मंदिर मार्गावर ही काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पाण्याची डबकी झाली आहे. तर इतर ही ओतूर शहरातील अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडून पाण्याची की दिसून येत आहे.

तसेच जेथे सिंमेट रस्ते झाले आहे त्या मार्गाच्या सुरूवातीला व मार्ग संपला आहे अशा दोन्ही जागी पाण्याची डबकी हमखास दिसून येत आहे. कारण सिमेंट रस्त्याची उंची वाढते व मग जेथून सिमेंट रस्ता सुरू होतो व जेथे संपतो तेथे खड्डा होऊन पाण्याचे डबके तयार होते.

तसेच शहरा अंतर्गत सिमेंट मार्गावर ही काही ठिकाणी खड्डे पडले आहे. एकूणच ओतूर शहरात अंतर्गत रस्त्यावर पडलेले खड्डे व त्यामुळे पाऊसाच्या पाण्याची तयार झालेली पाण्याची डबकी ह्याने नागरीक त्रस्त झाले आहे.

ओतूर शहरात पाण्याची डबकी साचल्याने मोठ्या प्रमाणात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून साथीचे रोग बळवण्याची शक्यता नाकारता येत नसून त्यासाठी ग्रामपंचायतीने उपाय योजना कराव्या अशी मागणी ही नागरिकांकडून होत आहे.

Pune
Chh. Sambhajinagar Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार, एक जखमी

याबाबत ओतूरचे सरपंच प्रशांत डुंबरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले ओतूर बसस्थानक ते ब्राह्मणवाडा चौकात व पुढील मार्गावरील डागडुंजी बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रामपंचायतीने पत्र व्यवहार केला असून सदर काम मंजूर झाले आहे. तरी संबधीत ठेकेदाराला प्रथम तातडीने खड्डे बुजवण्याची सुचना केली आहे.

तसेच शहरातील अंतर्गत रस्त्याचे खड्डे ग्रामपंचायत कडून बुजविण्यात येणार आहे. तर सिमेंट कॉक्रेटच्या रस्त्यावर पडलेल्या खड्या बाबत संबधीत ठेकेदाराना डागडुजी बाबत सुचना दिल्या आहे.

तसेच शक्य तेथे गटारी काढून पाऊसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्याचा ग्रामपंचायत प्रयत्न करनार आहे. तसेच ओतूर शहरात करण्याचा ग्रामपंचायत प्रयत्न करनार आहे. तसेच ओतूर शहरात मच्छरांचा बंदोबस्त करण्यासाठी औषध धुराळणी किंवा आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.