पुणे - शहरातील हडपसर, मुंढवा, बिबवेवाडी आणि मार्केट यार्ड परिसरातील आठ सराईत गुन्हेगारांना पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. सहा महिने ते दोन वर्षे या कालावधीसाठी त्यांना तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.