Pune City Transport : पुणे शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी पुणे स्टेशन अरोरा टॉवर्स विश्रांतवाडी आणि सिंहगड रोड जंक्शन दांडेकर पुल परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.
pune city transport
pune city transportsakal
Updated on
Summary

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी पुणे स्टेशन अरोरा टॉवर्स विश्रांतवाडी आणि सिंहगड रोड जंक्शन दांडेकर पुल परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी पुणे स्टेशन अरोरा टॉवर्स विश्रांतवाडी आणि सिंहगड रोड जंक्शन दांडेकर पुल परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करण्यासाठी नागरिक मिरवणुकीने येत असतात. या कालावधीत रस्त्यांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्यामुळे या परिसरातील वाहतूक मार्गांत बदल करण्यात येणार आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय (फायरब्रिगेड, पोलिस वाहने, रुग्णवाहिका) परिसरातील वाहतुकीत आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी आरटीओ चौकातून जहांगीर हॉस्पिटलच्या दिशेने जाणार्‍या मार्गाचा वापर करावा. जीपीओ चौकातून बोल्हाई चौकाकडे जाण्याचा मार्ग बंद ठेवण्यात येणार असून, वाहनचालकांनी किराड चौकातून नेहरू मेमोरियल मार्गे जावे. नरपतगिरी चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असून, वाहनचालकांनी कमला नेहरु हॉस्पिटल, पवळे चौक, कुंभारवेस चौकातून इच्छित स्थळी जावे. बॅनर्जी चौकाकडून शाहीर अमर शेख चौकाकडे जाण्याचा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी कुंभारवेस चौकातून इच्छितस्थळी जावे.

वाहतुकीतील हा बदल गुरुवारी (ता.१३) सकाळी सहा ते गर्दी संपेपर्यंत तात्पुरता अंमलात राहणार आहे.

पार्किंग व्यवस्था

मालधक्का चौक ते बोल्हाई चौक- पुणे स्टेशन, बोल्हाई चौक ते साधु वासवानी चौक, बोल्हाई चौक ते जी.पी.ओ., बोल्हाई चौक ते नरपतगिरी चौक, फोटोझिंको प्रेस रस्ता आणि बोल्हाई चौक ते डॉ. बॅनर्जी चौक या रस्त्यांवर अत्यावश्यक सेवेखेरीज सर्व प्रकारच्या वाहनांना नो-पार्किंग केली आहे.

वाहनचालकांसाठी आर.टी.ओ. शेजारी एस.एस.पी.एम.एस. मैदान (दुचाकी व चारचाकी वाहने) पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळ (दुचाकी व चारचाकी), ससून कॉलनी (दुचाकी वाहने) अशी पार्किंगची व्यवस्था केली आहे.

अरोरा टॉवर येथील कोयाजी रस्त्यावरून पुणे स्टेशनकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, एसबीआय हाउस चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडून अरोरा टॉवर्सकडे जाण्यास बंदी राहील. तसेच, नेहरू चौकाकाडून तीन तोफा चौकाकडे जाणारी वाहतूक बंद केली आहे. वाहनचालकांनी एस.बी.आय. हाऊस मार्गाचा वापर करावा. तर महात्मा गांधी रोडकडून अरोरा टॉवरकडे जाणारा मार्ग वाहतुकीसांठी बंद राहणार असून, वाहनचालकांनी बाटलीवाला बगीचा मार्गे इच्छितस्थळी जावे.

पार्किंग व्यवस्था

वाहन चालकांनी आपली वाहने तारापोर रोड, ईस्ट स्ट्रीट व अन्य रस्त्यांवरील पे-एण्ड पार्कच्या ठिकाणी पार्क करावीत. अरोरा टॉवर परिसरातील वाहतूक व्यवस्थेतील बदल शुक्रवारी (ता.१४) सकाळी सहा वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत असणार आहे. मिरवणूक मार्गांवरील वाहतूक आवश्यकतेनुसार, टप्प्या-टप्प्याने बंद किंवा पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे.

विश्रांतवाडी परिसर

एअरपोर्ट, टिंगरेनगरकडे जाणार्‍या वाहनांनी सादलबाबा चौक-चंद्रमा चौक- आळंदी जंक्शन-आंबेडकर चौक-गोल्फ क्लब चौक-येरवडा पोस्ट ऑफिस चौक-५०९ चौक मार्गे जावे.

कळस, म्हस्केवस्ती, बोपखेल, दिघी, आळंदीकडून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांनी कळसफाटा येथून टँक रोडने उजवीकडे वळून चव्हाण चाळीतून डावीकडे वळून सरळ पर्यायी कच्च्या मार्गाने शांतीनगर येथून टँक रोडने खडकी किंवा डावीकडे वळून मेंटल कॉर्नर मार्गे इच्छितस्थळी जावे.

विश्रांतवाडी परिसरातील वाहतूक व्यवस्थेतील बदल शुक्रवार (ता.१४) दुपारी तीनपासून गर्दी संपेपर्यंत असणार आहेत.

सिंहगड रोड जंक्शन (दांडेकर पूल) परिसरातील वाहतूक व्यवस्थेत गुरुवारी (ता.१३) रात्री आठ पासून गर्दी संपेपर्यंत आवश्यकतेनुसार बदल केले जाणार आहेत. या ठिकाणांहून मिरवणुका निघणार असून, मिरवणूक मार्गांवरील वाहतूक आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने बंद किंवा पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()