Pune : शहर विकासाची 'मिसिंग लिंक '

पुणे शहराच्या जुन्या हद्दीतील विकास आराखडा तयार होऊन दहा वर्षे होऊन गेली. हा कालावधी निश्चितच छोटा नाही
pune
punesakal
Updated on

विकास आराखड्याची योग्य आणि वेळेत अंमलबजावणी झाली नाही तर नियोजनबद्ध शहर विकासाला, पायाभूत सुविधांना खीळ बसते. पुणेकर हा अनुभव सध्या दररोज घेत आहेत. शहर आणि समाविष्ट गावांमधील ५२० किलोमीटर रस्ते पूर्णपणे विकसित न झाल्याने शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे आणि नवीन रस्ते बांधणी या दोन्ही पातळ्यांवरचे नियोजन 'मिस' झालेले दिसते.

- संभाजी पाटील @psambhajisakal

पुणे शहराच्या जुन्या हद्दीतील विकास आराखडा तयार होऊन दहा वर्षे होऊन गेली. हा कालावधी निश्चितच छोटा नाही. पण आराखड्यातील अनेक पायाभूत सुविधा अद्याप कागदावरच आहेत. ज्या कारणांसाठी आरक्षण टाकली जातात, त्या जागा ताब्यात येत नाहीत.

अनेक आरक्षणे राज्य सरकारच्या पातळीवर बदलली जातात. याच कारणामुळे शहर विकासाला अपेक्षित गती मिळत नाही. विकास आराखड्यात दाखवलेले रस्ते विकसित करण्यात वर्षानुवर्षे जातात परिणामी या सर्वांचा ताण शहराच्या वाहतुकीवर आणि विकासावर ही येतो. पुण्याची अवस्था काहीशी अशीच झाली आहे.

शहरातील अर्धवट विकसित झालेले रस्ते शोधण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला होता. त्याचा अहवाल नुकताच महापालिकेने प्रसिद्ध केला आहे. शहरातील ५२० किलोमीटर अंतरावरील रस्त्यांमध्ये ७०० मिसिंग लिंक किंवा अर्धवट कामे राहिलेली ठिकाणे आढळली आहेत. हे अर्धवट विकसित रस्ते शहरातील वाहतुकीची कोंडी वाढवत आहेत.

शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली नसल्याने दररोज २८ ते ३० लाख वाहने रस्त्यावरच असतात. एका बाजूला शहराचा विस्तार झाला आहे. त्या प्रमाणात पीएमपी वाढलेली नाही, त्यामुळे खासगी वाहनांची संख्या वाढत आहे.

pune
Pune Traffic Police : नो पार्किंगमध्ये वाहन लावताना जरा जपूनच; दंडाची रक्कम डेबिट, क्रेडिट कार्डद्वारेच स्वीकारणार

या वाहनांना जाण्यासाठी पुरेसे रस्ते नाहीत. जे रस्ते अस्तित्वात आहेत, त्यावर प्रचंड अडथळे आहेत. विद्यापीठ चौक, चांदणी चौक, जुना पुणे-मुंबई रस्ता, कात्रज चौक, कात्रज- कोंढवा रोड, सिंहगड रोड, पौड रोड, नगर रस्ता, हिंजवडी अशा अस्तित्वातील मोठ्या रस्त्यांची सध्याची अवस्था बिकट आहे. या रस्त्यांवर सुरू असणारी कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत. त्यामुळे विना अडथळा तुम्ही जाऊ शकता असा एकही रस्ता उदाहरणादाखल दाखवण्यासाठी शिल्लक नाही.

मिसिंग लिंकचा जो अहवाल समोर आला आहे, तो आपला विकास कोणत्या दिशेने सुरू आहे, हे दाखविण्यासाठी पुरेसा आहे. हडपसर, धायरी, औंध, कोथरुड, कर्वे रोड, बिबवेवाडी, संगमवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणावर रस्ते अपूर्ण आहेत. सध्याच्या वाहतूक कोंडीचा फटका याच भागात बसलेला दिसतो. त्यामुळे हे रस्ते पूर्ण करण्याला प्राधान्य द्यायला हवे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये सतत पाठपुरावा घ्यायला हवा.

pune
Pune : बाळाचे नवे रुप आणि आईला मिळालेल्या जीवदानाचा आनंद माळेगावकरांच्या गगणात मावेनासा

आता पावसाळा सुरू होईल, पण आजही अनेक रस्ते खोदून पडले आहेत, अनेक ठिकाणचे खड्डे बुजवलेले नाहीत. एका बाजूला अस्तित्वात असणारे रस्ते विना अडथळा उपलब्ध करून देणे, समाविष्ट गावांमध्ये व पर्यायी रस्ते बांधणी वेगात करणे आणि सर्वात महत्त्वाचे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे यावर भर द्यायला हवा.

मेट्रोच्या कामाचा वेग वाढवावा लागेल. अजून आपला दुसरा टप्पाही सुरू झालेला नाही, त्यासाठी प्रयत्न व्हायला हवा. शहरात कोणत्याही रस्त्यावर वाहन चालवणे धडकी भरवणारे, जिवाशी खेळणारे आहे. याचे मूळ पायाभूत सुविधांच्या नियोजनात आहे. शहर विकासाची ही 'मिसिंग लिंक' तातडीने जोडली नाही, तर शहर आणखी खड्ड्यात जायला वेळ लागणार नाही.

pune
Pune News : आठ लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी डॉ. अनिल रामोड यांना १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

हे नक्की करा

- प्रमुख रस्ते अडथळे मुक्त करणे

- रस्त्यावर होणारी कामे वेळेत पूर्ण करणे

- पीएमपीची संख्या, फेऱ्या शहराच्या सर्व भागात वाढवणे

- मंदावलेले मेट्रोचे काम वेगात पूर्ण करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.