पुणे - शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेत गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत असलेला श्वान ‘लिओ’चा आजारपणाने मृत्यू झाला आहे. लिओने मेफेड्रोनसह अमली पदार्थांचा साठा पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. .लॅब्रोडोर जातीच्या लिओचा जन्म जुलै २०१६ मध्ये झाला. तो चार महिन्यांचा असताना, सप्टेंबर २०१६ मध्ये, पुणे पोलीस दलातील श्वानपथकात त्याचा समावेश करण्यात आला. त्यानंतर त्याला प्रशिक्षकाकडून (हँडलर) खडतर प्रशिक्षण देण्यात आले.श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेताना त्याला अमली पदार्थ हुडकणे, तसेच कवायतीचे प्रशिक्षण देण्यात आले होते. श्वान प्रशिक्षण केंद्रातील खडतर प्रशिक्षण पूर्ण करण्यात आल्यानंतर त्याचा समावेश गुन्हे शाखेतील अमली पदार्थविरोधी पथकात करण्यात आला होता..यात बजावली महत्वाची भूमिका -सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोरमधील एका शेतात गांजाची लागवड करण्यात आली होती. या शेतातून ७० किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या कारवाईत लिओ सहभागी झाला होता. त्याने एका नायजेरियन तस्कराकडून गांजा, तसेच मेफेड्रोनचा साठा पकडून दिला होता..२०१९ मध्ये कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नायजेरियन नागरिकाकडून अमली पदार्थ आणि ५० किलो गांजा जप्त करण्यात लिओची महत्त्वाची भूमिका होती.पुणे रेल्वे स्थानक, तसेच बसस्थानक, येरवडा कारागृहात नियमितपणे अमली पदार्थांची तपासणी करण्यासाठी लिओला नेण्यात यायचे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.