Pune Traffic : पुणे शहरातील वाहतूक कोलमडली; नागरिकांचे हाल

भिडे पूल पाण्याखाली गेला असून, नदीपात्रातील रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
Pune Jungli maharaj Road Traffic
Pune Jungli maharaj Road Trafficsakal
Updated on

पुणे - भिडे पूल पाण्याखाली गेला असून, नदीपात्रातील रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे जंगली महाराज रस्त्यासह पेठांमधील रस्त्यांवर सोमवारी सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने वाहनचालकांना मन:स्ताप सहन करावा लागला.

खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. खडकवासला धरणातून रविवारी रात्रीपासून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने डेक्कन परिसरातील भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी भिडे पूल आणि शनिवारवाड्याकडून एरंडवण्याच्या दिशेने नदीपात्रातून जाणारा रस्ता बंद केला आहे.

डेक्कन जिमखाना आणि छत्रपती संभाजी पूलमार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे सदाशिव पेठ आणि शनिवार पेठेतील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. तसेच, जंगली महाराज रस्त्यावर सोमवारी सायंकाळी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

शहरातील स्वारगेट, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्त्यासह कात्रज, हडपसर, मुंढवा, विमाननगर भागात वाहतूक मंदावली होती. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या वाहनचालकांना अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसही हतबल झाल्याचे दिसून आले. दरम्यान, पाणी ओसरल्यानंतर भिडे पूल वाहतुकीस खुला करून दिला जाईल, अशी माहिती शहर वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.