Hording : पुणे शहरासह ग्रामीण भागातही होर्डिंग मृत्यूचे सापळे

पुणे शहरासह ग्रामीण भागातही अनधिकृत होर्डिंगमध्ये बेसुमार वाढ झाली असून, १० तालुक्यांमध्ये मिळून केवळ २७ होर्डिंग अधिकृत आहेत.
Illegal-Hoarding
Illegal-Hoardingsakal
Updated on

पुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागातही अनधिकृत होर्डिंगमध्ये बेसुमार वाढ झाली असून, १० तालुक्यांमध्ये मिळून केवळ २७ होर्डिंग अधिकृत आहेत. तर १ हजार ३७० अनधिकृत होर्डिंग आहेत. तसेच ८७ होर्डिंग धोकादायक असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

पुणे शहर व जिल्ह्यात अनधिकृत होर्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. महत्त्वाचे चौक, रस्ता बघून मोकळ्या जागेसह इमारतीवर २ ते ३ टन असे अवजड होर्डिंग उभारले आहेत. काही दिवसापूर्वी वादळात अनधिकृत होर्डिंग कोसळून नागरिकांना जीव गमवावा लागला तरीही प्रशासन व व्यावसायिक यांचे डोळे उघडलेले नाहीत. पुणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील होर्डिंगचा अहवाल जाहीर केला आहे. त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यात एकूण १ हजार ४४० होर्डिंग आहेत. त्यापैकी आंबेगाव १, बारामती २१, मुळशी ५ या तीन तालुक्यातच एकूण २७ होर्डिंग अधिकृत आहेत. उर्वरित सर्व होर्डिंग अनधिकृत आहेत. त्यांच्यापैकी केवळ २३ चे स्ट्रक्चरल आॅडिट झाले आहे. १ हजार २३० होर्डिंचे स्ट्रक्चरल आॅडिट झालेले नाही. ८७ होर्डिंग धोकादायक असून, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

Illegal-Hoarding
Pune News : लिंग गुणोत्तरात पुणे जिल्ह्यातील ५७५ ग्रामपंचायती ‘रेड झोन’मध्ये

तालुका - अनधिकृत होर्डिंगची संख्या

आंबेगाव - २६

बारामती - १७७

भोर - १०३

दौंड - ६०

जुन्नर - ४३

खेड - २२०

मावळ- १७६

मुळशी - ३७७

पुरंदर - ९७

शिरूर - १३४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()