Pune CNG Rate: CNGच्या दरात वाढ; प्रतीकिलो 91 रूपये मोजावे लागणार

CNG gas
CNG gasSakal
Updated on

पुणे : पुणे शहरात सीएनजीची वाटचाल शंभरीकडे होत असून पुणे व पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील सीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. चालू दरामध्ये चार रूपये प्रतीकिलोने वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) घेतला आहे.

(Pune CNG Gas Rate Latest Updates)

दरम्यान, MNGLने वाढवलेल्या दरानुसार शहरात सीएनजीच्या एका किलोसाठी 91 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एमएनजीएलने सीएनजीच्या दरात चार रूपयांनी कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता, त्यामुळे वाहन चालकांना एका किलोसाठी 87 रूपये द्यावे लागत होते पण आता पुन्हा या दरात वाढ करण्यात आली आहे त्यामुळे वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

CNG gas
Amit Shah: तीन तास बाहेर बसूनही अमित शाह खडसेंना भेटले नाहीत; महाजनांचा गौप्यस्फोट

कशी होत गेली दरवाढ (दर प्रती किलो)

  • जानेवारी - 66 रुपये

  • फेब्रुवारी - 68 रुपये

  • मार्च - 73 रुपये

  • एप्रिल - 77.20 रुपये

  • मे - 80 रुपये

  • जून - 82 रुपये

  • जुलै - 85 रुपये

CNG gas
News Update: दिवसभरात काय घडल्या महत्त्वाच्या घडामोडी? जाणून घ्या सविस्तर

दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी पेट्रोल डीलर असोशिएशनने मागण्या मान्य न केल्यामुळे एका दिवसाचा बंद पुकारला होता. त्यामुळे डीलरच्या कमिशनमध्ये वाढ न केल्याच्या वादातून टोरंट सीएनजी पंप एका दिवसासाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता सीएनजीच्या दरात प्रतीकिलो ४ रूपयांनी वाढ करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.